*श्री क्षेत्र झुंज दुर्घटना प्रकरणी युद्ध पातळीवर मदतकार्य सुरू*
*दुर्घटनाग्रस्तांच्या नातेवाईकांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधी व सीएम रिलीफ फंडातून मदत मिळावी*
*पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी*

*दुर्घटनाग्रस्तांच्या नातेवाईकांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधी व सीएम रिलीफ फंडातून मदत मिळावी*
*पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी*
✍मनोज खोब्रागडे✍
मध्य महाराष्ट्र ब्युरो चीफ
मीडिया वार्ता न्यु-8208166961
अमरावती : -वरुड तालुक्यातील श्री क्षेत्र झुंज येथील वर्धा नदीमध्ये बोट उलटून झालेल्या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधी व सीएम रिलीफ फंडाच्या माध्यमातून तात्काळ मदत मिळावी, अशी मागणी राज्याच्या महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना प्रत्यक्ष निवेदन देऊन केली.
अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यातील वर्धा नदीत बुडून उलटून झालेल्या दुर्घटनेत 14 सप्टेंबर रोजी अकरा व्यक्ती नदीमध्ये बुडाल्या. त्यापैकी तीन व्यक्तींचे मृतदेह शोध बचाव पथकाने शोधून काढले असून उर्वरित व्यक्तींचा आपत्ती निवारण दल व जिल्हा पथकाद्वारे शोध घेणे चालू आहे. सदर घटनेमुळे संबंधितांच्या कुटुंबीयांवर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला असून या दुःखद प्रसंगी आपण सर्व त्यांच्या समवेत उभे आहोतच तरी या घटनेतील व्यक्तींच्या कुटुंबियांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या, तसेच सीएम रिलीफ फंडाच्या माध्यमातून नुकसान भरपाईपोटी तात्काळ मदत मिळावी, अशी विनंती पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी मुख्यमंत्र्यांना केली.
महाविकास आघाडी शासन आपद्ग्रस्तांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. दुर्घटनाग्रस्तांच्या नातेवाईकांना शासनाकडून निश्चितपणे मदत मिळवून दिली जाईल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही या दुर्घटनेबाबत दुःख व्यक्त करत आपद्ग्रस्तांच्या कुटुंबियांना मदत मिळण्याबाबत सकारात्मकता दर्शवली आहे, अशी माहिती पालकमंत्र्यांनी दिली.