नागपूरात कोचिंग क्लासेसवर सीबीआयचे छापे, पाच विद्यार्थ्यांना अटक.

50

नागपूरात कोचिंग क्लासेसवर सीबीआयचे छापे, पाच विद्यार्थ्यांना अटक.

नागपूरात कोचिंग क्लासेसवर सीबीआयचे छापे, पाच विद्यार्थ्यांना अटक.
नागपूरात कोचिंग क्लासेसवर सीबीआयचे छापे, पाच विद्यार्थ्यांना अटक.

✒ युवराज मेश्राम ✒
नागपुर जिल्हा प्रतिनिधी
9923296442
नागपूर:- आज सर्वीकडे शिक्षणाच बाजारीकरण करुन शिक्षणाचा खेळ खंडोबा सुरु असल्याचे अनेक घटने वरुन समोर येत आहे. त्यात आता मनुष्य मात्राला जीवदान देणा-या डॉक्टरी पेशालाही काही नराधम कलंकित करत असल्याचे नागपुर मधून समोर आले आहे.

देशातमधील मेडिकल कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळवून देण्यासाठी नीट परीक्षेत बोगस विद्यार्थी बसवून गैरव्यवहार करणाऱ्या कोचिंग क्लासेसवर सीबीआयने छापे घातले. याप्रकरणी नागपुरातील पाच विद्यार्थ्यांना अटक केल्याने नागपूरात एकच खळबळ उडाली आहे.

नागपुर येथील सक्करदरा परिसरातील आर. के. एज्युकेशन अ‍ॅण्ड करिअर गाईडन्स आणि कॅरिअर पॉइंट या कोचिंग क्लासेसचे संचालक परिमल कोतपल्लीवार आणि अंकित यांच्यासह पाच जणांना दिल्ली सीबीआयने अटक केली.

देशात डॉक्टर होण्यासाठी नीट परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होणे गरजेचे असते. कोचिंग क्लासेसमध्ये विद्यार्थांनी चांगले गुण मिळवून देऊन नामांकित वैद्यकीय महाविद्यालयात ॲडमिशन मिळवून देण्याची गॅरंटी आर.के.एज्यूकेशन कोचिंग क्लासेसने घेतली होती.

कोचिंग क्लासेसच्या संचालकांनी काही टोळ्यांशी संगनमत करून लाखोंमध्ये व्यवहार करीत देशातील नामवंत वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवले. काही विद्यार्थ्यांनी यासाठी संपर्क केला. आरोपींनी एका विद्यार्थ्याला नामांकित वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवून देण्यासाठी 50 लाख रुपये घेतले. विद्यार्थी व त्याच्या पालकांनी आरोपींना 50 लाखांची हमी म्हणून आगाऊ धनादेश दिले.
त्यानंतर आरोपींनी मूळ विद्यार्थांच्या नावाने परीक्षेत बनावट विद्यार्थी बसवले. गेल्या 12 सप्टेंबरला देशात नीट परीक्षा झाली. नागपुरातील पाच विद्यार्थांच्या नावाने बनावट विद्यार्थांनी ही परीक्षा दिली. याची माहिती दिल्ली सीबीआयला मिळाली. सीबीआयने शहानिशा करून गुन्हा दाखल करून परिमल, अंकित यांच्यासह पाच जणांना अटक केली. त्यानंतर नागपूर सीबीआय कार्यालयाच्या मदतीने आज मंगळवारी दोन्ही कार्यालयात छापा टाकून तेथील दस्तावेज जप्त केले.