पाच लाखांची खंडणी स्वीकारताना महिलेसह दोघांना अटक

56

*पाच लाखांची खंडणी स्वीकारताना महिलेसह दोघांना अटक*

*पुणे* – जिल्हा व्यवस्थापकाकडे केलेली तक्रार मागे घेण्यासाठी आणि सोशल मीडियावर बदनामी न करण्यासाठी सहाय्यक लेखा अधिकाऱ्याकडे पाच लाख रुपये खंडणीची मागणी करून स्वीकारताना एका सामाजिक कार्यकर्ता महिलेसह तिच्या चालकाला पोलिसांनी अटक केली.

सुप्रिया कुंडलिक वाघमारे (वय ३२) आणि आकाश महादेव शेलार (वय २६) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी एका ५४ वर्षीय सहाय्यक लेखा अधिकाऱ्यांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ मर्यादित येथे लेखापरीक्षण अधिकारी म्हणून काम करतात.महात्मा फुले मागासवर्गीय कर्ज वितरण योजनेतील कर्ज वितरण करण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे. या योजनेत यांनी मनमानी केल्याची तक्रार फिर्यादी महिलेने जिल्हा व्यवस्थापकाकडे केली होती.

त्यानंतर तक्रार मागे घेण्यासाठी आणि सोशल मीडिया वरून होणारी बदनामी थांबविण्यासाठी आरोपी महिलेने फिर्याद यांच्याकडे पाच लाख रुपये खंडणीची मागणी केली होती. फिर्यादीने अशी माहिती पोलिसांना देत या प्रकरणी तक्रार दिली होती. त्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने सामाजिक आयुक्तालयाच्या आवारात लाच घेण्यासाठी आलेल्या महिला आणि तिच्यात चालकाला सापळा असून अटक केली.