घुग्घुस शहरातून जाणारी जडवाहतूक बंद करा* *युवासेना तालुकाप्रमुख हेमराज बावणे यांची मागणी*

55

*घुग्घुस शहरातून जाणारी जडवाहतूक बंद करा*

*युवासेना तालुकाप्रमुख हेमराज बावणे यांची मागणी*

घुग्घुस शहरातून जाणारी जडवाहतूक बंद करा* *युवासेना तालुकाप्रमुख हेमराज बावणे यांची मागणी*
घुग्घुस शहरातून जाणारी जडवाहतूक बंद करा*
*युवासेना तालुकाप्रमुख हेमराज बावणे यांची मागणी*

पंकज रामटेके
घुग्घुस शहर प्रतिनिधी

घुग्घुस शहरातून जाणारी जडवाहतूक तात्काळ बंद करण्याची मागणी चंद्रपूर युवासेना तालुकाप्रमुख हेमराज बावणे यांनी घुग्घुस पोलीस ठाण्यात निवेदन देऊन केली आहे.
सध्या घुग्घुस शहरातून कोळशाच्या जडवाहनांची वाहतूक मोठया प्रमाणात सुरु आहे. जडवाहतुकी मुळे शहरात अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे व प्रदूषणाचे प्रमाण वाढले आहे. या जडवाहनांना दुसरा मार्ग देण्यात आला आहे परंतु ते त्या रस्त्याने न जाता घुग्घुस शहरातून जातात त्यामुळे अपघात होऊन जीवितहानी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ही जडवाहतूक तात्काळ बंद करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली अन्यथा शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
निवेदन देतांना चंद्रपूर युवासेना तालुकाप्रमुख हेमराज बावणे, शहर प्रमुख सतीश बोंडे, शिवसेना नेते बंटी घोरपडे उपस्थित होते.