युवकच परिवर्तनाचा खरा कणा* रायुकाँ चे मेहबूब भाई शेख यांचे प्रतिपादन *गडचिरोलीत युवक मेळावा!*

52

*युवकच परिवर्तनाचा खरा कणा*

रायुकाँ चे मेहबूब भाई शेख यांचे प्रतिपादन

*गडचिरोलीत युवक मेळावा!*

युवकच परिवर्तनाचा खरा कणा* रायुकाँ चे मेहबूब भाई शेख यांचे प्रतिपादन *गडचिरोलीत युवक मेळावा!*
युवकच परिवर्तनाचा खरा कणा*
रायुकाँ चे मेहबूब भाई शेख यांचे प्रतिपादन
*गडचिरोलीत युवक मेळावा!*

मारोती कांबळे
मीडिया वार्ता न्युज
गडचिरोली जिल्ह्या प्रतिनिधी
ग्रामीण मो.नं.९४०५७२०५९३

*गडचिरोली:-* देशाचे आधारस्तंभ युवक असून परिवर्तनाचे खरे कणाही युवक असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी केले.
ते सोमवार 14 सप्टेंबर रोजी स्थानिक पटेल मंगल कार्यालयात आयोजित राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या मेळाव्यात प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.
मेळावाच्या अध्यक्षस्थानी आमदार धर्मराव बाबा आत्राम होते तर उदघाटन स्थानी राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा तथा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्रीताई आत्राम होते. व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून रायुकाँ चे प्रदेश कार्याध्यक्ष रविकांत वरपे, प्रदेश उपाध्यक्ष ऋतुराज हलगेकर, जिल्हा प्रभारी जगदीश पंचबुद्धे, जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर, महिला जिल्हाध्यक्षा शाहीन हकीम, ऋषिकांत पापडकर बबलू भैय्या हकीम, सेवादलचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर बारापात्रे, श्रीनिवास गोडशेलवार, तुकाराम पुरणवार, लीलाधर भरडकर, संजय कोचे, विवेक बाबनवाडे, श्याम धाईत, योगेश नांदगाये, विजय धकाते आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे मार्गदर्शन करतांना राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब भाई शेख यांनी, युवकांनी जबाबदारीची व विकासाची धुरा आपल्या हाती घेऊन राज्याचा व पर्यायाने जिल्ह्याचा कायापालट व परिवर्तन करावे असे म्हणत विकास करण्याची धमक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात असून युवकांची फळी तयार करून जिल्हा व तालुका कार्यकारिणी, गाव तिथे शाखा, बूथ कमिटी तयार करून व मजबूत करून आतापासूनच पक्षाच्या कामाला लागल्यास जिल्हा ‘राष्ट्रवादीमय’ होईल असा विश्वास व्यक्त करून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांसाठी सज्ज व्हा असे आवाहनही मेहबूब भाई शेख यांनी करून यावेळी युथ व युवकांना आपल्या मराठी भाषेच्या शैलीतून जोश, उत्साह व स्फूर्तीही भरविले.
तर अध्यक्षीय स्थानावरून आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रामुख्याने युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी झटत असून सर्वच घटकातील लोकांना न्याय देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस हाच एकमेव पक्ष असल्याचे आवर्जून सांगून यावेळी आ. धर्मराव बाबा आत्राम यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.
तर याचवेळी माजी जि. प.अध्यक्ष भाग्यश्रीताई आत्राम, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर यांनी सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकून मार्गदर्शन केले.
तत्पूर्वी रिक्त असलेल्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदासाठी मेहबूब भाई शेख यांनी अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत मुलाखती घेतले.
प्रास्ताविक रायुकाँ चे प्रदेश सरचिटणीस ऋषिकांत पापडकर यांनी तर सूत्रसंचालन कुलदीप सोनकुसरे यांनी केले उपस्थितांचे आभार कृपाल मेश्राम यांनी मानले. यावेळी रा.काँ. चे पदाधिकारी व बहुसंख्येने युवक उपस्थित होते.
*बॉक्स*
*पारंपरिक टोपी (रेखी) परिधान करून आदिवासी संस्कृती जपले!*
गडचिरोली जिल्हा म्हटले की, आदिवासी बहुल अशी ओळख व ख्याती आहे, आदिवासी संस्कृती व परंपरा जपण्यासाठीच खास भामरागडच्या माडिया समाज वास्तव्यास असणाऱ्या ठिकाणाहून बांबूने बनविलेली टोपी (रेखी)आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष मेहबूब भाई शेख, कार्याध्यक्ष रविकांत वरपे यांना परिधान करायला लावून टोपी भेट दिले.