हिंगणघाट नगर पलिकेच्या कर्मचाऱ्यांना जीवे मारण्याची धमकी, पालिका कर्मचाऱ्यांनी केल कामबंद आंदोलन.

46

✒ मुकेश चौधरी ✒
उपसंपादक मिडिया वार्ता न्युज
7507130263
हिंगणघाट,दि.16 सेप्टेंबर:- हिंगणघाट नगर पालिकेच्या स्वास्थ विभागाच्या माजी महिला कर्मचारी तसेच तिच्या मुलाने वेतनातील फरकाची रक्कम दिरंगाईने मिळत असलेल्या करणावरुन संबंधित कर्मचाऱ्यांना अशील शिविगाळ करीत जीवे मारण्याची धमकी दिल्याने नगर पालिका प्रशासनात एकच खळबळ उडाली. याच्या निषेध म्हणुन नगर पालिका कर्मचाऱ्यांनी आज कामबंद आंदोलन केले.

सदर प्रकरणी संबंधित महिला आणि तिच्या मुलावर कारवाई व्हावी, अशी मागणी यावेळी नगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी नगराध्यक्ष प्रेम बसंतांनी तसेच पालिका प्रशासनाकडे केली.

नगर पालिकेच्या स्वच्छता विभागातून नियुक्ती कर्मचारी त्रिवेणी नक्के व पिंकू मारवे यांनी काल दि.15 रोजी व दि.9 रोजी संबंधित कर्मचाऱ्याशी सातव्या वेतन आयोगातील फरकाची रक्कम कमी का काढली असा जाब विचारीत कार्यालयातील कर्मचाऱ्यास अश्लील शिविगाळ करीत मारहाण करण्याची धमकी दिल्याने संतप्त झालेल्या कर्मचाऱ्यांनी आज सकाळपासुनच कामबंद आंदोलनास सुरुवात केली आहे. जो पर्यत कारवाई होत नाही तो पर्यंत हे आंदोलन करण्यात येणार अशी माहिती न.पा.च्या कर्मचा-यानी दिली.