राज्यामध्ये अतिवृष्टीमुळे जमिनीचे होणारे भूस्खलन तसेच दरड कोसळणे याबाबतच्या अभ्यास व क्षेत्र निश्चितीसाठी समिती गठित

✍मनोज खोब्रागडे✍
मध्य महाराष्ट्र ब्युरो चीफ
मीडिया वार्ता न्यु-8208166961
अलिबाग,जि.रायगड :- महाराष्ट्र राज्य हे आपत्तीप्रवण राज्य असून राज्याला दरवर्षी विविध आपत्तीचा सामना करावा लागतो. राज्यामध्ये येणाऱ्या आपत्तीपैकी दरड कोसळणे व भूस्खलन होणे ही एक भीषण आपत्ती असून राज्यामध्ये झालेल्या या दुर्घटनेत वित्तीय व मनुष्यहानी मोठ्या प्रमाणात झालेली आहे. या आपत्ती होण्याची संभाव्यता अभ्यास करण्यासाठी विविध प्राधिकरणाची मदत घेवून संभाव्य क्षेत्र निश्चित करण्यासंदर्भात मंत्रिमंडळ उपसमिती सहाय्य करण्यासाठी तज्ञ समिती गठीत करण्यास शासनाने मान्यता दिली असून नुकताच याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.
ही समिती पुढीलप्रमाणे आहे:-
प्रा.रवि सिन्हा, आयआयटी, मुंबई हे या समितीचे अध्यक्ष तर सदस्य म्हणून श्री.प्रभाकर देशमुख, संचालक, भूजल सर्वेक्षण आणि विकास संस्था, भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण (GSI)चे प्रतिनिधी, डॉ.सतीश ठिगळे, माजी भूशास्त्र विभाग प्रमुख, पुणे विद्यापीठ, डॉ.शिरीष रावण, (UN-SPIDER), डॉ.भावना उंबरीकर, सहायक प्राध्यापक (भूगर्भशास्त्र विभाग, पुणे विद्यापीठ), डॉ.टी.पी.सिंग, संचालक, (सिम्बायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ जिओ इन्फॉर्मेटिक, पुणे), डॉ.अभिजीत खांडगे, संचालक झेनोलिथ जिओ सर्व्हिस, कॉलेज ऑफ इंजीनिअरिंग, पुणे यांचे प्रतिनिधी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या समितीचे सदस्य सचिव संचालक (आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण) हे असणार आहेत.