नाशिक मध्ये पोलिसांनेच अल्पवयीन मुलीचे अपहरण.

59

नाशिक मध्ये पोलिसांनेच अल्पवयीन मुलीचे अपहरण.

नाशिक मध्ये पोलिसांनेच अल्पवयीन मुलीचे अपहरण.
नाशिक मध्ये पोलिसांनेच अल्पवयीन मुलीचे अपहरण.

✒नाशिक जिल्हा प्रतिनिधी✒

नाशिक:- नाशिक मधून एक धक्कादायक आणि संतापजनक बातमी समोर आली आहे. त्यामूळे रक्षकच बनला भक्षक अशी चर्चा सुरु आहे. नाशिक येथे चक्क पोलिसांनेच एका अल्पवयीन मुलीचे अपहरण केले. फूस लावून अल्पवयीन मुलीचे अपहरण करणाऱ्या पोलिसाला अटक करून बेड्या ठोकण्यात आले आहे. नाशिकच्या पंचवटी परिसरात ही घटना घडल्याची माहिती आहे.

पिढीत मुलीच्या कुटुंबीयांशी ओळखीचा पोलिसाकडून गैरफायदा संशयित पोलीस दीपक जठार हा नाशिकमधील उपनगर पोलीस ठाण्यात कार्यरत आहे. संशयिताच्या विरोधात पॉक्सो अंतर्गत देखील गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. संशयिताने पीडित मुलीच्या घरच्यांशी असलेल्या ओळखीचा फायदा घेत अपहरण केल्याचा आरोप आहे. फूस लावून त्याने तिला पळवून नेल्याचा दावा केला जात आहे. या घटनेमुळे नाशिक मध्ये एकच खळबळ उडाली आहे.