सांगली नाल्यामुळे नागरीकांचे हाल, नागरिक जागृती मंच सांगली तर्फे प्रशासनाला निवेदन.

✒ संजय कांबळे ✒
सांगली जिल्हा प्रतिनिधी
989009362
सांगली:- स्थानिक सांगली येथील वॉर्ड क्रमांक 19 महानगर पलिकेचे मध्यवर्ती ठिकाण जेथे सांगली जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा न्यायालय व भविष्यातील महानगर पलिकेचे मुख्यालय होणार आहे. तेथून हाकेच्या अंतरावर असलेल्या नैसर्गिक नाल्याचे रूपांतर गटारीत झाले आहे व सदर नाल्यावर छोट्या सिमेंट पाईप टाकून बांधकामे करण्यात आल्याने. थोडा पाऊस पडला तरी या परिसरात मोठ्या प्रमाणात महापूर आल्यागत रस्त्यावर पाणी साचून राहत आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत व आरोग्य बिघडत आहे.
त्यामुळे स्थानिक नगरिकान मध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष दिसून येत आहे. त्यामुळे नागरिक जागृती मंच, सांगली यानी याबाबत प्रशसनाला निवेदन दिले.
निवेदनातुन केलेली मागणी.
प्रशासनाच्या अधिका-यानी जागेवर येऊन पाहणी करवी. आणि या नाल्यामुळे निर्माण झालेल्या दुर्गदी लवकर तोगडा काढावा. अशी तेथील स्थानिक नागरिकांची मागणी होत आहे. तरी आपण पाहणी करून नागरिकांना न्याय द्यावा ही विनंती निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे. अन्यथा स्थानिक नागरिकांना बरोबर घेऊन आंदोलन करण्यात येईल अशी माहिती नागरिक जागृती मंच, सांगली सतीश साखळकर, उमेश देशमुख, सुधीर गावंडे यांनी दिली.