गोंडपिपरी तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार
रायुकाॕचे तालुकाध्यक्ष जयेश कार्पेनवार यांचा शिवसेनेत प्रवेश

राजू ( राजेंद्र ) झाडे
गोंडपीपरी तालुका प्रतिनिधी
मो नं 9518368177
गोंडपीपरी:- राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष आणि तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या भंगाराम तळोधी येथील ग्रामपंचायत सदस्य, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे ऍक्टिव्ह गोंडपिपरी तालुका अध्यक्ष जयेश कारपेनवार यांचा आज गोंडपिपरी येथे शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष संदीपभाऊ गिरहे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख संदीप भाऊ करपे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शिव बधन बांधुन आज शिवसेनेमध्ये प्रवेश केला.
यावेळी तालुका प्रमुख सूरज माडूरवार,नरेंद्र इंगोले, रियाज कुरेशी, बळवंत भोयर, बालू झाडे, संतोष चीलंनकर, ओमप्रकाश मडावी, वंदेश तेलसे, शुभम भोयर यांची उपस्थिती होती.