*आष्टी पोलीस स्टेशनमधील कार्यरत दोन पोलीस शिपायांना लाच घेताना रंगेहात पकडले*

51

*आष्टी पोलीस स्टेशनमधील कार्यरत दोन पोलीस शिपायांना लाच घेताना रंगेहात पकडले*

*आष्टी पोलीस स्टेशनमधील कार्यरत दोन पोलीस शिपायांना लाच घेताना रंगेहात पकडले*
*आष्टी पोलीस स्टेशनमधील कार्यरत दोन पोलीस शिपायांना लाच घेताना रंगेहात पकडले*

राजू ( राजेंद्र ) झाडे
गोंडपीपरी तालुका प्रतिनिधी
मो नं 9518368177

आष्टी:- पोलीस स्टेशनमधील कार्यरत दोन पोलीस शिपायांना लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले २५ हजाराची लाच मागितली होती.

गडचिरोली जिल्ह्यातील आष्टी पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत पोलीस शिपाई पंकज राठोड व पंकज चव्हाण यांना लाचलुचपत विभागाच्या चमूने आज सायंकाळी ६.०० वाजता ८ हजार रुपयांची लाच घेतांना रंगेहात पकडले . मूलचेरा तालुक्यातील देशबंधुग्राम येथील संजय मंडल याने आज विश्वकर्मा जयंतीनिमित्त घरगुती पार्टी साठी देशी दारुची अर्धा पेटी तारसा येथील देशी दारुभट्टी यांच्या दारुभट्टी मधून १५ सप्टेंबर ला दुचाकी ने घेऊन येत असतांना आष्टीं येथील नाक्यावर पोलिस शिपाई पंकज राठोड व पंकज चव्हाण यांनी बुधवार ला ४ वाजता दरम्यान गाडी थांबवून तपासणी केली व त्यांची दारु पकडली .व २५ हजाराची मागणी केली होती. दारु जप्त करुन त्याला मारहाण करण्यात आली . त्यानंतर रात्री १० वाजता च्या सुमारास १०,००० रु. त्याच्या पत्नीने पोलीस स्टेशनमध्ये नेऊन दिले.त्याच्यावर रात्री ११.३४ गुन्हा दाखल करण्यात आला. पत्नीने विनवणी करूनही त्याला सोडले नाही .व उर्वरित रक्कम आज शुक्रवारी दुपारी ४.०० वाजता आष्टी नाक्यावर ८ हजार रु. त्यांच्या गाडीच्या डिकीत टाकण्यात सांगण्यात आले. त्यांनतर ते दोघेही पोलीस कर्मचारी चंद्रपूर रोडला नदीपर्यंत गेले .व पैशाची वाटणी करुन परत येत असतांना पोलीस शिपाई पंकज राठोड याला लाचलुचपत विभागाचे पोलीस निरीक्षक यशवंत राऊत यांनी रंगेहात पकडले .त्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये पोलीस शिपाई पंकज चव्हाण याला पकडण्यात आले. लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार दोघांनाही अटक करण्यात आली . लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पोलीस निरीक्षक यशवंत राऊत व त्यांचे सहकारी कारवाही करीत आहे. बातमी लिहिपर्यंत ही कारवाही सुरु होती.