दिघोरीतील शुद्ध पाण्याची आर. ओ.ची अज्ञाताकडून तोडफोड

44

दिघोरीतील शुद्ध पाण्याची आर. ओ.ची अज्ञाताकडून तोडफोड

दिघोरीतील शुद्ध पाण्याची आर. ओ.ची अज्ञाताकडून तोडफोड*
दिघोरीतील शुद्ध पाण्याची आर. ओ.ची अज्ञाताकडून तोडफोड

राजू ( राजेंद्र ) झाडे
गोंडपीपरी तालुका प्रतिनिधी
मो नं 9518368177

पोंभूर्णा:- तालुक्यातील मौजा- दिघोरी येथील शुद्ध पाण्याची आर. ओ. मशीनची अज्ञात माथेफिरुनी दगड्याचा मारा करुन तोडफोड केली असल्याने जनतेकडून कारवाईची मागणी केलेली आहे. दिघोरी ग्रामपंचायतने दि. १४ सप्टेंबरला ग्रामसभा आयोजित करण्यात आली. ग्रामसभेत तंटामुक्ती समिती तसेच पाणी पुरवठा गठीत करण्यात आली होती. त्याच रात्री अज्ञात इसमाने शुध्द पाण्याच्या आर. ओ. वर दगड्याचा मारा करुन तोडफोड केली. परिणामी काचा तुटल्याने आतमध्ये सहज शिरकाव करता येतो. शुध्द पाण्याच्या आर. ओ. मशीनची तोडफोड करण्याचा हेतू धक्कादायक असल्याने भविष्यात गावकऱ्यांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता असल्याने आर. ओ. चालक अमित निमसरकार यांनी तंटामुक्ती समिती व बेंबाळ चौकीत तक्रार दाखल केलेली असून पोलीस काय कारवाई करतात याकडे जनतेचे लक्ष वेधलेले आहे.