नायगाव कोयला श्रमिक सभेच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार

48

नायगाव कोयला श्रमिक सभेच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार

कामगारांच्या परिश्रमाने कोयला श्रमिक सभा प्रथम क्रमांकावर- किशोर बोबडे अध्यक्ष कोयला श्रमिक सभा, नायगाव

नायगाव कोयला श्रमिक सभेच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार
नायगाव कोयला श्रमिक सभेच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार

पंकज रामटेके
घुग्गुस प्रतिनिधी
मो.८४८४९८८३५५
घुग्गुस:- वेकोली वणी क्षेत्राच्या नायगाव कोळसा खाणीतील कोयला श्रमिक सभेच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार क्षेत्रीय अध्यक्ष दीपक जैस्वाल यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला.

कोयला श्रमिक सभा या वेकोलीच्या कामगार संघटनेचे नायगाव कोळसा खाणीत 56 सदस्य बनवून या संघटनेला प्रथम क्रमांकावर नेण्यात आले आहे. त्याअनुषंगाने बेलोरा-नायगाव डीप ओसी माईन निलजई उपक्षेत्र, वणी क्षेत्र कार्यालयात सत्कार समारोहाचे आयोजन करण्यात आले होते.

याप्रसंगी मनोगत व्यक्त करतांना नायगाव कोयला श्रमिक सभेचे अध्यक्ष किशोर बोबडे म्हणाले मागील चार ते पाच वर्षांपूर्वी कोयला श्रमिक सभेचा कमी स्तर होता परंतु क्षेत्रीय अध्यक्ष दीपक जैस्वाल यांच्या सहयोगाने व कामगारा बांधवांच्या परिश्रमाने तिसऱ्या क्रमांकावरून या संघटनेला प्रथम क्रमांकावर नेण्यात आले त्यामुळे कामगार बांधव हे कौतुकास पत्र आहे.

यावेळी कोयला श्रमिक सभेचे सचिव आर.के.जयस्वाल, उपाध्यक्ष गोकुल येद्दूलवार, सहसचिव रोशन जोगी, किशोर जुनघरी, सीताराम चौरसिया, प्रकाश दास, अरुण मेश्राम, टी.एस.भाटी, अनिल रेगुंडवार उपस्थित होते.