दहशतवादी हल्ल्याचा पार्श्वभूमीवर नागपुरात हाय अलर्ट जारी. नागपुर पोलीस तैनात.

✒ युवराज मेश्राम ✒
नागपुर जिल्हा प्रतिनिधी
9923296442
नागपूर :- देशात मोठ्या दहशतवादी हल्ला होण्याचा पार्श्वभुमीवर आणि मुंबईतुन 1 आणि दिल्लीमधुन सहा दहशतवादी पकडल्याच्या पार्श्वभूमीवर नागपुरात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. नागपूर मधील पोलिस दलाला सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे शहरातील सर्व लॉज आणि हॉटेलमध्ये सर्च ऑपरेशन राबवित आहेत. शहरात येणाऱ्या सर्व रस्त्यांवरील सीमांवर नाकेबंदी करण्यात आली असून प्रत्येकाची कसून चौकशी केली जात आहे.

दिल्ली पोलिसांनी 14 सप्टेंबरला सायंकाळच्या सुमारास घातपाताच्या संशयावरून दहतशवादी पकडले होते. पकडण्यात आलेल्या दहशतवाघा कडून अनेक धक्कादायक खुलासे होत असुन त्यांनी अनेक स्थिकानाची रेकी केल्याचे समोर आल्याने सध्या देशात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

मुंबईतील जान मोहम्मद नावाचा एक दहशतवादी याला महाराष्ट्र एटीएसकडून पकडण्यात आले. त्याच्या धारावीतील घराची झाडाझडती घेण्यात आली. तसेच त्याच्या पत्नीची कसून चौकशी केली. त्याला संपूर्ण मुंबईची खडा न् खडा माहिती असल्याचेही सांगितले जात आहे. तसेच त्याचे दाऊदसोबत जुने संबंध असल्याचेही एटीएस प्रमुखांनी सांगितले होते. त्यानंतर महाराष्ट्र एटीएस पथक हे याप्रकरणाची चौकशी करण्यासाठी दिल्लीला रवाना झाले होते. तसेच जान मोहम्मद गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असून तो बहरीनला एकाचा खून करण्यासाठी गेला होता, अशीही माहिती समोर आली आहे.
दरम्यान, आज महाराष्ट्र एटीएसने मुंबईतून आणखी एका संशयित दहशतवाद्याला अटक केली आहे. त्यामुळे नागपुरात अलर्ट जारी करण्यात आला असून संशयितांना ताब्यात घेऊन कसून चौकशी केली जात आहे. लॉज आणि हॉटेलची चौकशी केली जात आहे. तसेच अनेक ठिकाणी नाकेबंदी करण्यात आली आहे, असे नागपूरचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here