भय्यासाहेब तथा यशवंतराव भिमराव आंबेडकर यांच्या ४४ व्या स्मृती दिन साजरा

गुणवंत कांबळे, प्रतिनिधी मुंबई
मो. नं.९८६९८६०५३०
सूर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर यांच्या 44 व्या स्मृतिदिनानिमित्त आंबेडकर भवन येथे तमाम बौद्धांची मातृसंस्था भारतीय बौद्ध महासभा यांच्या वतीने आदरांजली पर कार्यक्रम आयोजित केला होता.या कार्यक्रमाची सुरुवात दिग्गज गायकांनी भीम गीतांच्या माध्यमातून केली. भारतीय बौद्ध महासभा पाटण तालुका, वंचित बहुजन आघाडी सायन कोळीवाडा तालुका महासचिव:- विजय कांबळे यांनी रणसिंग फुंकले भीमा तू जाळण्या गुलामी हे भीम गीत गायले. कार्यक्रमास सर्व भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी राष्ट्रीय, केंद्रीय सर्व मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते. आदरणीय भीमराव आंबेडकर साहेब यांच्या अध्यक्षतेखाली हा आदरांजली पर कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमासाठी मुंबईतील तमाम बौद्धाचार्य केंद्रीय शिक्षक महिला केंद्रीय शिक्षिका राष्ट्रीय सचिव पाटण तालुक्यातील सर्व मान्यवर पदाधिकारी उत्तम मगरे ,आदरणीय आगाने काका ,पाटण तालुक्यातील सर्व मान्यवर पदाधिकारी पाटण तालुका भारतीय बौद्ध महासभा मुंबई सरचिटणीस भगवान भोळे साहेब, वंचित बहुजन आघाडी सायन कोळीवाडा तालुका अध्यक्ष:- आदरणीय अशोक इंगळे साहेब वंचित बहुजन आघाडी सायन कोळीवाडा तालुका महासचिव:- आदरणीय विजय कांबळे, वंचित बहुजन आघाडी तालुका आरोग्य समिती अध्यक्ष:- प्रदीप रोकडे वंचित समर्थक आदरणीय सचिन बल्लाळ, बौद्धाचार्य सुनील कांबळे, रविंद्र कांबळे, वंचित बहुजन आघाडी युवा अध्यक्ष कुमार (भाई) कदम आदी मान्यवर उपस्थित होते. सर्वांनी मिळून आदरणीय सूर्यपुत्र भैय्यासाहेब यांना आदरांजली श्रद्धांजली वाहण्यात आली. स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या जीवनावर मान्यवर पदाधिकारी यांची भाषणे झाली कार्यक्रम व्यवस्थितरित्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन दादर येथे पार पडला.