केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांना रुग्णालयात गार्डने शिव्या देत काठीने केली मारहाण.

51

केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांना रुग्णालयात गार्डने शिव्या देत काठीने केली मारहाण.

केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांना रुग्णालयात गार्डने शिव्या देत काठीने केली मारहाण.
केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांना रुग्णालयात गार्डने शिव्या देत काठीने केली मारहाण.

=== मुख्य मुद्दे ===
● सामान्य नागरिक बनून रुग्णालयात गेलेल्या केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना सुरक्षा रक्षकाची मारहाण
● मनसुख मांडविया यांनी आज एक धक्कादायक खुलासा
● जेव्हा मंत्रीला मारहान होते, तर सामान्य जनतेच काय?

✒ मुकेश चौधरी ✒
उपसंपादक मिडिया वार्ता न्युज
7507130263
मुंबई:- नवी दिल्लीतुन एक आरोग्य विभागाचे पितळ उघडणारी बातमी समोर येत आहे. भारत सरकार मध्ये केंद्रीय आरोग्य मंत्री असलेले मनसुख मांडविया यांनी आज एक खळबळजनक खुलासा केला. त्यामूळे आयोग्य विभागाचे पितळ उघडे झाले आहे.

केंद्रीत आरोग्य मंत्री मनसुख मांडविया हे काही दिवसांपूर्वी ते अचानक सफदरगंज रुग्णालयात एक सामान्य नागरिक म्हणून तपासणी साठी गेले होते. त्यावेळेस त्यांना रुग्णालयात सुरक्षासाठी ठेवण्या आलेल्या एका सुरक्षारक्षकाने त्यांना काठीने मारहाण केली. हेच ते सफदरगंज रुग्णालय आहे त्यानी चार आरोग्यविषयक सुविधेच उद्घाटन केल. या प्रसंगी ते बोलत होते त्यावेळेस मांडविया यांनी हा खळबळजनक खुलासा केला आहे.

याशिवाय, रुग्णांना पुरविल्या जाणाऱ्या सुविधांमध्ये सुधारणा करुन रुग्णालयातील गैरप्रकार दूर करावेत आणि रुग्णालयाला मॉडेल हॉस्पिटल बनवावे, असे निर्देशही सफरगज रुग्णालय प्रशासनाला दिले आहेत.

सुरक्षा रक्षकाने काठी का मारली? उद्घाटन समारंभात डॉ. मांडाविया म्हणाले की, रुग्णालयात ते एक सामान्य रुग्ण म्हणून तपासणी करण्यासाठी आलो असता. यावेळी ते एका बाकावर बसत असताना सुरक्षा रक्षक मला बोलला बाकावर बसू नको असे म्हणत, शिव्या दिल्या आणि काठीने मारहाण केली. याशिवाय, रुग्णालयात इतर रुग्णांना स्ट्रेचर आणि इतर वैद्यकीय मदतीसाठी रुग्णालयात भटकावं लागत आहे, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली. यावेळी त्यांनी रुग्णालयात आलेल्या एका 75 वर्षीय महिलेचे उदाहरण दिले. ते म्हणाले की, महिला आपल्या मुलासाठी स्ट्रेचर मिळवण्यासाठी एका गार्डकडे विनवणी करत होती, पण महिलेला स्ट्रेचर दिले नाही.