जि प सभापती माधवराव चंदनखेडे यांच्या पुढाकाराने गरजू अपंग तरुणाला भाजपा पोहना सर्कलच्या वतीने आमदार समीर भाऊ कुणावार यांच्या शुभ हस्ते एक लाखाची आर्थिक मदत

60

प्रा.अक्षय पेटकर
वर्धा जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी
9604047240

पोहना येथील गरीब अपंग तरुण सुजित खुशाल राऊत वय २५ वर्ष या तरुणाचा गेल्या पाच वर्षा आधी दुचाकीने अपघात झाला होता त्यामध्ये त्याच्या पायाला जबर दुखापत झाली . गरीबीची परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्यामुळे व्यवस्थित इलाज होऊ शकला नाही . शासकीय दवाखान्यात दोन-तीनदा ऑपरेशन करूनही तो व्यवस्थित चालू शकत नाही पण पोहणा येथेच राहत असल्यामुळे सतत माधवराव चंदनखेडे यांच्या नजरेत येत होता त्याचा अपंगत्व माधवराव चंदनखेडे यांना पावल्या गेलं नाही हा अपंग मुलगा चालायला लागला पाहिजे असा विचार सतत त्यांच्या मनात होता तेव्हा त्यांनी डॉक्टर उमरे नागपुर यांच्याशी संपर्क साधला व या तरुणा बद्दलची माहिती त्यांना दिली त्यावर त्यांनी हा मुलगा दुरुस्त होऊ शकतो असे सांगितले.
लागणारा खर्च करण्याची ताकद त्या कुटुंबात नसल्यामुळे माधवराव चंदनखेडे यांच्या पुढाकाराने भारतीय जनता पार्टी पोहना सर्कल च्या वतीने भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून सेवा समर्पण ही भावना जपत आमदार समीर भाऊ कुणावार यांच्या हस्ते त्या गरीब अपंग तरुणाला एक लाख रुपये रोख मदत देण्यात आली व पुढील खर्चाची सुद्धा मदत आपण करू असे आश्वस्त करण्यात आले. यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन मडावी, भाजपा जिल्हा महामंत्री किशोर जी दिघे, शिक्षण सभापती मृणालताई माटे, पंचायत समिती सभापती शारदाताई आंबेडकर, पंचायत समिती सभापती सुरेखाताई टिपले, माजी सभापती गंगाधर राव कोल्हे, तालुका अध्यक्ष आकाश पोहाणे, तालुका महामंत्री भाग्येश देशमुख, तुषार आंबटकर, सुरेश वखरे ,नितीन वाघ, चंदू भाऊ माळवे, सुनील सरोदे यासह अनेक भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.