शेतकऱ्यानो आत्मविश्वास बाळगा खंबीर रहा मी सदैव आपल्या पाठीशी : रवींद्र शिंदे

54

शेतकऱ्यानो आत्मविश्वास बाळगा खंबीर रहा मी सदैव आपल्या पाठीशी : रवींद्र शिंदे

शेतकऱ्यानो आत्मविश्वास बाळगा खंबीर रहा मी सदैव आपल्या पाठीशी : रवींद्र शिंदे
शेतकऱ्यानो आत्मविश्वास बाळगा खंबीर रहा मी सदैव आपल्या पाठीशी : रवींद्र शिंदे

त्रिशा राऊत
चिमूर तालुका प्रतिनिधी
मिडीया वार्ता न्यूज चंद्रपूर
Mo 9096817953

चंद्रपूर : – सविस्तर वृत्त असे आहे की ,जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, चंद्रपूर द्वारा शेतकरी कल्याण निधी अंतर्गत तसेच स्व. श्रीनिवासराव शिंदे मेमोरीअल रविंद्र शिंदे चॅरीटेबल ट्रस्टच्या वतीने वरोरा तालुक्यातील जळका, डोंगरगाव व टेमुर्डा येथील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थीक मदत करण्यात आली. वरोरा तालुक्यातील जळका येथील शेतकरी भालचंद्र गारघाटे यांच्या शेतातील गोठ्याला अचानक आग लागल्याने गोठ्यातील जनावरांचा होरपळून मृत्यू झाला तसेच शेतीकामात येणारी अवजारे व खताच्या बॅग जळाल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले होते त्यामुळे चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, चंद्रपूर द्वारा शेतकरी कल्याण निधी अंतर्गत तसेच स्व.श्रीनिवासराव शिंदे मेमोरीअल रविंद्र शिंदे चॅरीटेबल ट्रस्टच्या वतीने त्यांना तात्काळ मदत देण्यात आली आहे. शेतकरी अन्नदाता असुन त्यांना त्वरित मदत पोहचने गरजेचे होते. जळका येथील घटना अत्यंत दु:खद होती. सर्वप्रथम याबाबत दखल घेवुन तात्काळ मदत करण्यात आली. तसेच डोंगरगाव येथील शेतकरी अनिल पुंडलीक सोमलकर यांना सुद्धा मदत करण्यात आली. कोरोनाने मृत झालेल्या व गोरगरीब शेतक-यांच्या मुला-मुलींच्या लग्नाचा खर्च स्व. श्रीनिवासराव शिंदे मेमोरीअल रविंद्र शिंदे चॅरीटेबल ट्रस्टच्या वतीने उचलेल, अशी ग्वाही रवि शिंदे यांनी दिली. यावेळी बैकेचे संचालक तथा माजी अध्यक्ष रविंद्र शिंदे, डॉ. विजय देवतळे, सामाजिक कार्यकर्ते दत्ताभाऊ बोरेकर, प्रदीप देवतळे आदी उपस्थित होते.
खांबाळा येथील आंदोलनाला भेट
ग्रामीण भागात शेतक-यांच्या भेटीदरम्यान रवि शिंदे यांनी खांबाळा येथील एका आंदोलनाला सदिच्छा भेट देवून त्यांचे प्रश्न समजून घेतले.