आ. मुनगंटीवार यांच्या आमदार निधीतून होणार बांधकाम

17

आ. मुनगंटीवार यांच्या आमदार निधीतून होणार बांधकाम

आ. मुनगंटीवार यांच्या आमदार निधीतून होणार बांधकाम
आ. मुनगंटीवार यांच्या आमदार निधीतून होणार बांधकाम

सौ.हनिशा दुधे
तालुका प्रतिनिधी बल्लारपूर
मीडिया वार्ता न्युज चंद्रपूर
मो 9764268694

चंद्रपूर,:-सन 2021-22 या वर्षात स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ.सुधीर मुनगंटीवार यांच्या आमदार निधीतून बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात 61 लाख 6 हजार रूपये किंमतीच्या विकासकामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे या मंजूर विकासकामांमध्ये पोंभुर्णा तालुक्यातील देवई येथे 2 नग हायमास्ट दिव्यासाठी 8 लाख 93 हजार रूपये तसेच देवई ते घनोटी तुकूमकडे जाणार्‍या पांदन रस्त्याच्या खडीकरणासाठी 7 लाख रुपये, केमारा येथे 2 नग हायमास्ट दिव्यासाठी 8 लाख 93 हजार रूपये तसेच केमारा येथे किशोर पोरते ते कालीदास वेलादी यांच्या घरापर्यंत 5 नालीच्या बांधकामासाठी 5 लाख रुपये, चिंतलधाबा येथे शिवराम मडावी यांच्या घरापासून उध्दव कोसरे यांच्या घरापर्यंत बंदिस्त नालीच्या बांधकामासाठी 5 लाख तसेच चिंतलधाबा येथे चरणदास उईके ते शोभा पोरेते यांच्या घरापर्यंत सिमेंट काँक्रीट नालीच्या बांधकामासाठी 10 लाख, बल्लारपूर तालुक्यातील कोठारी या गावात वॉर्ड क्रमाक 5 येथील बुटानी खोब्रागडे यांच्या घरापासून श्रीरंग देवाळकर यांच्या घरापर्यंत सिमेंट काँक्रीट रस्त्याच्या बांधकामासाठी 7 लाख रुपये, भिवकुंड (विसापूर) येथील रस्त्याचे खडीकरणासाठी 7 लाख, मूल तालुक्यातील डोगरगाव येथील वॉर्ड क्रमांक 1 येथे केशव चौधरी यांच्या घराजवळ एक बोअरवेल तसेच मारोडा येथील भिवसन मोहल्ल्यात श्रीहरी जुनारकर यांच्या घराजवळ बोअरवेल या विकासकामांचा समावेश आहे. ही बांधकामे सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक 2 चंद्रपूरच्या माध्यमातून लवकरच सुरू होणार आहे.ही कामे मंजूर केल्याबद्दल जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संध्या गुरनुले, भाजपाचे जिल्हाध्यक्ष तसेच जिल्हा परिषद सदस्य देवराव भोंगळे, जि. प. सदस्य राहूल संतोषवार, जिल्हा परिषद सदस्य वैशाली बुध्दलवार, अ‍ॅड. हरीश गेडाम, पृथ्वीराज अवताडे, भाजपा तालुकाध्यक्ष किशोर पंदिलवार, सरचिटणीस रमेश पिपरे, उपसभापती ज्योती बुरांडे, भाजपा महिला आघाडीच्या अध्यक्ष तसेच पंचायत समिती सभापती अल्का आत्राम, पंचायत समिती सभापती इंदिरा पिपरे, मूल पंचायत समितीचे सभापती चंदू मारगोनवार, पंचायत समिती सदस्य विनोद देशमुख आदी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मुनगंटीवार यांचे अभिनंदन केले आहे.