खापा येथील नागलवाडी कालव्याच्या दुरुस्ती कामात होत असलेल्या लापरवाई ची तात्काळ चौकशी करा – महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेची सिंचन विभागाकडे मागणी.

52

खापा येथील नागलवाडी कालव्याच्या दुरुस्ती कामात होत असलेल्या लापरवाई ची तात्काळ चौकशी करा – महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेची सिंचन विभागाकडे मागणी.

खापा येथील नागलवाडी कालव्याच्या दुरुस्ती कामात होत असलेल्या लापरवाई ची तात्काळ चौकशी करा - महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेची सिंचन विभागाकडे मागणी.
खापा येथील नागलवाडी कालव्याच्या दुरुस्ती कामात होत असलेल्या लापरवाई ची तात्काळ चौकशी करा – महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेची सिंचन विभागाकडे मागणी.

हिंगणा तालुका जिल्हा नागपूर
देवेंद्र सिरसाट
9822917104

खापा येथील नागलवाडी तलावाच्या लघु सिंचन कालव्याच्या दुरुस्ती कामात होतं असलेली लापरवाई व त्यामुळे शेतकऱ्यांचे होतं असलेले अतोनात नुकसान विचारात घेऊन कामाची तात्काळ चौकशी करा अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच्या जिल्हाध्यक्षा सौ. कल्पना चौहान यांच्या नेतृत्वातील शिष्ठ मंडळाने कार्यकारी अभियंता, लघु जलसिंचन विभाग यांना निवेदनाद्वारे दिले.

निवेदनात अनेक मुद्दे उपस्थित करून त्यावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. १९७९ सालात निर्माण करण्यात आलेल्या नागलवाडी तलावाद्वारे शेजारील अनेक गावांतील जमिनींच्या सिंचनाची व्यवस्था करण्यात आली आहे. तीन वर्षांपूर्वी लघु सिंचन विभागाद्वारे तलावाचा बंधारा, कालवा तथा ओव्हरफ्लो च्या सफसफाईची निविदा काढण्यात आली. परंतु कंत्राटदाराने देण्यात आलेले काम अत्यंत निम्न दर्जाचे व दर्जाहीन करून बिलाचे भूगतान नं झाल्यामुळे अर्धवट सोडून दिले. कंत्राटदाराद्वारे काम अर्धवट सोडून दिल्यामुळे विभागाद्वारे प्लास्टिक चा वापर करून तात्पुरते काम करून घेतले गेले. तलावाच्या बांधावर उगवलेले वृक्ष तसेच छोट्या झाडांना मुळासकट उपटून काढणे अपेक्षित असताना तसे नं करता वृक्ष अर्ध्यात कापून सोडून देण्यात आले. बंधाऱ्यावरील मार्गात मोठ्या भेगा पडल्या असून बंधाऱ्यांची अवस्था दयनीय बघावयास मिळते असे स्पष्ट करत विभागाद्वारे कामात होतं असलेल्या दुर्लक्षामुळे शेतकऱ्यांची अतोनात हानी होतं असल्याचे खेदपूर्वक नमूद करण्यात आले.

नागलवाडी तलाव परिसर हा सौंरक्षित वनाला लागून असून तलावाच्या आसपास असलेल्या शेतांवर सांबर, रानडुक्कर आणि जंगली जनावरांचा मोठ्या प्रमाणात वावर सुरू असतो असे नमूद करत रात्रीच्या वेळी जंगली जनावर कालवा ओलांडून शेतांमध्ये जाऊन शेतीचे नुकसान करीत असल्याचे चर्चेदरम्यान सांगण्यात आले. जनावरांच्या वावरामुळे बंधाऱ्यावरील पसरविण्यात आलेले प्लास्टिक फाटले असून बंधाऱ्याला भेगा पडून पाणी झिरपून शेतात पसरत आहे ज्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होतं असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

तलावावरील उगवलेल्या वृक्षांची मुळे बंधाऱ्यात गेली असून त्यामुळे बंधाऱ्याला भेगा पडून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. भेगांमधून पाणी झिरपल्यामुळे बंधाऱ्याला मोठ्याप्रमाणात नुकसान झाले असून बंधारा वाहून जायची भीती निर्माण झाली असून तलावाचा बांध फुटून गावात जीवित अथवा आर्थिक हानी झाल्यास त्याला जवाबदार कोण असा संतप्त सवाल कार्यकारी अभियंता श्री. हटवार यांना करण्यात आला.

बंधाऱ्याच्या ओव्हरफ्लोची सफाई नं झाल्यामुळे पाणी नालीद्वारे शेतात जाऊन पिकांचे नुकसान होतं असून बंधाऱ्याची दयनीय परिस्थिती बघता लघु सिंचन विभागाचे होत असलेले दुर्लक्ष ही गंभीर तसेच आश्चर्यकारक बाब असल्याचे खेदपूर्वक नमूद करण्यात आले.

नागलवाडी तलावाच्या दुरुस्तीचे लाखो रुपयांचे काम खापा उपविभागांतर्गत झाले असून कामात मोठ्या प्रमाणात गडबड आणि लापरवाही झाली असून येव्हढा खर्च करून तलावातील परिस्थितीत काही विशेष फरक पडलेला नाही हे दुर्दैवच म्हणावं लागेल असे खेदपूर्वक स्पष्ट करण्यात आले.

निवेदनाद्वारे सदर कामाची उच्चस्तरीय चौकशी करून कामात लापरवाई करणाऱ्या अधिकारी व कंत्राटदारावर तात्काळ कायदेशीर कार्यवाही करण्याबाबत विनंती करण्यात आली.

निवेदनाची प्रतिलिपी मा. मुख्य अभियंता, सिंचन विभाग व मनसे प्रदेश सरचिटणीस व महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच्या प्रदेश अध्यक्षा मा. सौ. रिटाताई गुप्ता यांना महितीस्तव सादर करण्यात आले.

महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेना प्रदेशाध्यक्षा सौ. रिटाताई गुप्ता यांच्या मार्गदर्शनात तसेच जिल्हाध्यक्षा सौ. कल्पना चौहान यांच्या नेतृत्वात देण्यात आलेले निवेदन व त्यानंतर झालेल्या सविस्तर चर्चेत जनहित कक्षाचे प्रदेश सरचिटणीस श्री. महेश जोशी, जिल्हाध्यक्ष श्री. इकबाल रिझवी, शहर अध्यक्ष श्री. अरुण तिवारी, उपशहर अध्यक्ष श्री. विकास साखरे, विभाग अध्यक्ष श्री. पंकज हटवार, मंगला लांबट व सौ. सुनीता बोडखे, सौ. दुर्गा शिवणकर, सौ. किरण नगराळे व मिनल कौशिक आवर्जून उपस्थित होते.