कृषी बिल रद्द करून राज्यसरकारने शेतकऱ्यांच्या स्वातंत्र्यावर गदा घातला – विनोद जाधव

43

कृषी बिल रद्द करून राज्यसरकारने शेतकऱ्यांच्या स्वातंत्र्यावर गदा घातला – विनोद जाधव


विनायक सुर्वे

मंगरूळपीर:-  केंद्रातील भाजपप्रणीत मोदी सरकारने शेतकरी कृषीविधेयक बिल पारित केले परंतु त्या कृषी विधेयक बिलाला राज्यातील काँग्रेस-राष्ट्रवादीकाँग्रेस-शिवसेना आघाडी सरकारने स्थगिती दिल्यामुळे महाराष्ट्र प्रदेश भाजपाने राज्यभर धरणे आंदोलन व राज्यसरकारच्या त्या स्थगनादेशाच्या प्रतीची होळी करून निषेध केला.
जिल्ह्यात भाजपा जिल्हाध्यक्ष आ. राजेंद्र पाटणी यांच्या नेतृत्वात भाजपा व भाजपा किसान मोर्चाच्या वतीने मंगरूळपीर उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून राज्यसरकारच्या त्या स्थगनादेशाची प्रतीची होळी करण्यात आली.
राज्यसरकार शेतकऱ्यांच्या हिताचे हे बिल रद्द करून एक प्रकारे शेतकऱ्यांचे स्वतंत्र हिरावून घेत आहे. शेतकऱ्यांना पुतना मावशीचे प्रेम दाखवून फुळका आणीत आहे. या अगोदर माजी मुख्यमंत्री तथा राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत शेतकऱ्यांना दिलेला मतदानाचा अधिकार काढून घेतला. केंद्र सरकारने पारित केलेल्या या विधेयकामुळे शेतकरी दलाल मुक्त होणार असुन बाजारपेठेचे स्वातंत्र्य मिळणार आहे. शेतकऱ्यांसाठी एक देश एक बाजारपेठ होणार. शेतकऱ्यांना आपला शेतमाल कुठेही योग्य भावात विकण्याचे स्वतंत्र मिळणार आहे परंतु राज्यातील हे बीघाडी सरकार शेतकऱ्यांच्या स्वातंत्र्यावर गदा घालण्याचं काम करून पाप करीत आहे, अशा तीव्र शब्दात भाजपा किसान मोर्चा प्रदेश कार्यकारणी सदस्य विनोद पाटील जाधव यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
धरणे आंदोलन प्रसंगी भाजपा शहराध्यक्ष शामभाऊ खोडे, भाजपा तालुका अध्यक्ष रवींद्र ठाकरे, जिल्हा संयोजक नगरसेवक पुरुषोत्तम चितलांगे प्रा.वीरेंद्रसिंग ठाकूर, नगरसेवक अनिल गावंडे,प.स.सदस्य अतुल गायकवाड यांचेही समयोचित भाषणे झाली तर आंदोलनात शेतकरी, लोकप्रतिनिधी, भाजपा ग्रामीण व शहरचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.