वडनेर येथील डॉ. रवींद्रजी बोरकर व श्री. किशोरभाऊ वैतागे यांच्या घरच्या गणपतीचे इको फ्रेंडली विसर्जन
सतत तीन वर्षापासून इको फ्रेंडली पद्धतीने विसर्जन

सतत तीन वर्षापासून इको फ्रेंडली पद्धतीने विसर्जन
अक्षय पेटकर
वर्धा जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी
हिंगणघाट :- प्रथम पूजनीय गणपतीच्या गणेशोत्सवाला 10 सप्टेंबर गणेश चतुर्थीपासून सुरुवात झाली आणि बघता बघता आज आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्याचा दिवसही उगवला. आज रविवार 19 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी आहे. भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाची चतुर्थी गणेश चतुर्थी म्हणून साजरी केली जाते. असे मानले जाते की या दिवशी दुपारी गणपतीचा जन्म झाला होता. त्यांच्या जयंतीनिमित्त, गणेश चतुर्थीपासून अनंत चतुर्दशीपर्यंत भारताच्या सर्व भागात 10 दिवस गणेशोत्सव साजरा केला जातो. चतुर्थीच्या दिवशी बाप्पाचे भक्त गणपतीची मूर्ती त्यांच्या घरी आणतात त्यांची विशेष पूजा करतात. आज अखेर दहा दिवसांच्या गणपतीचे विसर्जन करण्यात आले.
या 10 दिवसांमध्ये गणपतीला त्यांचे आवडते मोदक, लाडवांचं नैवेद्य अर्पण केले जाते. असे म्हटले जाते की गणपती दुःख दूर करणारा आणि सुख देणारा आहे. अशा स्थितीत जो कोणी या काळात प्रामाणिक अंतःकरणाने गणपतीची पूजा करतो, त्याला निश्चितच त्यांचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि त्यांच्या दुःखाचा अंत होतो.
त्याचप्रमाणे आज वडनेर येथील डॉ. रवींद्र बोरकर व श्री. किशोरभाऊ वैतागे यांच्या घरच्या गणपतीला भजनाच्या सह्ह्याने मोठ्या थाटामाटात गणपती बाप्पाला इको फ्रेंडली पद्धतीने निरोप देण्यात आला. तीन वर्षापासून ची परंपरा यांच्या घरच्या गणपतीला इको फ्रेंडली विसर्जन देण्यात येते.दरवर्षीप्रमाणे यंदामात्र गणपती विसर्जनाची ती धूम पाहायला मिळणाली नाही कोरोनामुळे यंदाचा गणेशोत्सवही अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात आला. तसेच, गणपती विसर्जनासाठी मिरवणुकीची परवानगी नसल्याने अत्यंत साध्या पद्धतीने भाविकांनी आपल्या घरगुती लाडक्या बाप्पाला निरोप दिला. राहुल दुरतकर , सचिन महाजन , हेमंत वैतागे,अमित झाडे , मंगेश लांडगे, रवी वैतागे ,वछला वैतागे,मीनाक्षी वैतागे, सोनाली वैतागे, शारदा वैतागे आकाश , आशिष , ओम, कृष्णा , तेजु साक्षी श्रद्धा उपस्थित होते ,