आ.समिर कुणावार यांचे अध्यक्षतेखाली भूखंडाचे पट्टे वितरण..
उर्वरित लाभार्थ्यांनाही मिळणार लवकरच लाभ

उर्वरित लाभार्थ्यांनाही मिळणार लवकरच लाभ
अक्षय पेटकर
वर्धा जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी
9604047240
हिंगणघाट,दि. 20 सप्टेंबर
प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत ‘सर्वांसाठी घरे 2022’ या योजनेतील पात्र लाभार्थ्यांना भूखंडाच्या स्वामित्वाचे अधिकृत पट्टे शासनातर्फे दिले जात असून शहरातील उर्वरित लाभार्थ्यांनासुद्धा याचा तत्काळ लाभ मिळेल असे प्रतिपादन आमदार समिरभाऊ कुणावार यांनी भुखंड पट्टे वितरण कार्यक्रमाच्या वेळी केले.
सदर पट्टेवाटपाचा कार्यक्रम आज दि.20 रोजी स्थानिक नगरपरिषद सभागृहात आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी आमदार समिरभाऊ कुणावार हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून नगराध्यक्ष प्रेम बसंतांनी,मुख्याधिकारी अनिल जगताप,नगरसेविका सौ.शुभांगी डोंगरे,सौ.किरण धनरेल, नगरसेवक राहुल सोरटे, भाजयुमो प्रदेश सचिव अंकुश ठाकूर, नगरसेवक प्यारू कुरेशी, अमन काळे, सोनु गवळी, नरेश युवनाते सोबतच सामाजिक कार्यकर्ता सुनील डोंगरे, पत्रकार राजेश कोचर , सोनू पांडे, विठु बेनिवार ,अतुल नंदागवळी उपस्थित होते.
कार्यक्रमप्रसंगी नगर परिषदेच्यावतीने अध्यक्ष बसंतांनी तसेच उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशांत चापले यांनी केले.यावेळी नगरपालिका अध्यक्ष प्रेम बसंतानी यांनीसुद्धा उपस्थितांना मार्गदर्शन केले तर आमदार समीर भाऊ कुणावार यांनी अतिक्रमण धारकांना उपरोक्त योजनेंतर्गत घरकुल योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांना प्रथम भूखंडाच्या स्वामित्वाचे पट्टे मिळविण्याची प्रक्रिया महत्वाची असल्याचे सांगितले.
सदर पट्टे मिळविण्यासाठी आमदार कुणावार यांनी विविध अधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या, गेली 4 वर्षे अथक परिश्रम घेतल्यानेच आज पहिल्या टप्प्यातील 80 अतिक्रमण धारकांना पट्टे मिळाले आहेत.
प्रधानमंत्री नरेंद्र जी मोदी यांनी जाहीर केलेली प्रधानमंत्री आवास योजना याअंतर्गत सर्वांसाठी घरे मिळावी अशी ती योजना असून यामध्ये अतिक्रमण मध्ये राहणारे जे लोक आहे त्यांना पट्टे दिल्याशिवाय घरकुल मिळत नाही पट्टे देणे ही प्रक्रिया फार महत्त्वाची होती .या संदर्भात आमदार समीर कुणावर त्यांनी अनेक बैठका घेऊन यातील अडथळे दूर करून पट्टे मिळविण्यासाठी प्रयत्न केले असे आमदार समीर कुणावर यांनी सांगितले.
हे पहिल्या टप्प्यातील अतिक्रमण जागेतील 80 पट्टे आज वाटप करण्यात आले असून अनेक वार्डातील प्रकरण अजून मान्यतेसाठी सादर झाले असून ते सुद्धा पट्टे लवकरच उपलब्ध होतील अशी माहिती नगरपरिषद कर्मचारी श्री. प्रशांत चाफले यांनी दिली.
कार्यक्रमात उपस्थित सर्व मान्यवरांच्या उपस्थितित शहरातील शास्त्री वार्ड, मुजुमदार वार्ड, वीर भगतसिंग वार्ड ,काजी वार्ड, येथील 80 पात्र लाभार्थ्यांचे पट्टे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमप्रसंगी नगरपरिषद अभियंता विश्वनाथ माळवे, अनिल नासरे, प्रशासकीय अधिकारी शिंदे, नगररचनाकार रोहित वायचाळ, कु. प्रियंका भोईटे, कु. सुचिता आंबटकर तसेच प्रधानमंत्री आवास योजनेतील कर्मचारी प्रशांत चापले, प्रमोद बोरकर ,पप्पू ब्रम्हे इत्यादिसह सर्व कर्मचारी वृंद उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन पप्पू ब्रम्हे यांनी केले तर प्रमोद बोरकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.