आठ जिल्ह्य़ात वाढीव ओबीसी आरक्षण लागू केल्याबद्दल काँग्रेसच्या ओबीसी विभागाकडून पालकमंत्री वडेट्टीवारांचे अभिनंदन
शेतकऱ्यावर सक्ती न करता शासकिय यत्रनेकडून पिक पाहणी करण्याची वाढई यांची मागणी.

शेतकऱ्यावर सक्ती न करता शासकिय यत्रनेकडून पिक पाहणी करण्याची वाढई यांची मागणी.
✍संतोष मेश्राम✍
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
( ग्रामीण )-9923497800
चंद्रपूर : सविस्तर वृत्त खलील प्रमाणे आहे चंद्रपूरचे पालकमंत्री तथा राज्याचे बहुजन कल्यान, खार जमिनी विकास, मदत व पुनर्वसन मंत्री विजयभाऊ वडेट्टीवार यांनी ओबीसी आरक्षण चंद्रपूर जिल्ह्य़ातील मध्ये ११ टक्के होते ते १९ टक्के आणि गडचिरोली जिल्ह्य़ातील ६ टक्के होते ते १७ टक्के करण्यासाठी विशेष प्रयत्न करून या दोन जिल्ह्य़ासह एकूण आठ जिल्हयात ओबीसी आरक्षण सुविधेत वाढ करुन लागु केल्याबद्दल काँग्रेसच्या ओबीसी विभागाच्या वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात आले. तसेच इ पिक पाहणीची शेतकऱ्यांवर सक्ती न करता शासकीय यंत्रणेकडून इ – पिक पाहणी करावी अशी मागणी काँग्रेसचे ओबीसी विभागाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष नंदकिशोर वाढई यांनी पालकमंत्री वडेट्टीवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
राज्यामध्ये सध्यास्थितीत शेतकऱ्याने शेतात लावलेल्या पिकाची पिक पाहणी करण्याकरीता ई-पिक पाहणी कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत शेतकऱ्याचे सर्वे. नं. एकुण क्षेत्र, पोटखराब क्षेत्र तसेच शेतातील पिके यांची माहिती ई-पिक पाहणी सॉफ्टवेअरमध्ये शेतकऱ्यायांनी स्वतः भरून व फोटो काढून अपलोड करने बंधनकारक करण्यात आले आहे. वरील या सर्व बाबी करने आजच्या शेतकऱ्यायांची आर्थिक परीस्थिती बघता अडचणीचे ठरत आहे. या सर्व बाबी लक्षात घेता येत नाही का हे सर्व काही तरी अडचणी निर्माण होत आहे