आता सामाजिक क्षेत्रात नवी उभारी व वैभव बनवा! आ.धर्मराव बाबा आत्राम यांचे प्रतिपादन

14

आता सामाजिक क्षेत्रात नवी उभारी व वैभव बनवा!

आ.धर्मराव बाबा आत्राम यांचे प्रतिपादन

आता सामाजिक क्षेत्रात नवी उभारी व वैभव बनवा! आ.धर्मराव बाबा आत्राम यांचे प्रतिपादन
आता सामाजिक क्षेत्रात नवी उभारी व वैभव बनवा!
आ.धर्मराव बाबा आत्राम यांचे प्रतिपादन

अमोल रामटेके अहेरी तालुका प्रतिनिधी,9405855335

अहेरीत बबलू भैय्या हकीम यांचे सेवानिवृत्तीपर भावपूर्ण सत्कार
संस्थेतर्फे ‘मोर’ ची देखणी प्रतिकृती भेट
शानदार व दिमाखात सत्कार सोहळा!

अहेरी:-आता सामाजिक व राजकीय क्षेत्रात नव्याने उभारी घेऊन वैभव बनवा असे प्रतिपादन आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी केले.
ते रविवार 19 सप्टेंबर रोजी येथील इंडियन फंक्शन हाल मध्ये भगवंतराव हायस्कुल, इंदाराम येथे मुख्याध्यापक पदी सेवा दिलेले बबलू भैय्या हकीम यांचे सेवनिवृत्तीपर अभिष्टचिंतन व गौरव ग्रंथ प्रकाशन सोहळ्यात उदघाटनीय स्थानावरून बोलत होते.
समारंभाच्या अध्यक्षस्थानी आदिवासी सेवक तथा संस्थापक अध्यक्ष अब्दुल हकीम अब्दुल रहीम होते. तर व्यासपीठावर चाचम्मा हकीम, सत्कारमूर्ती बबलू भैय्या हकीम, माजी जि. प.अध्यक्षा भाग्यश्रीताई आत्राम, रा.यु.काँ.चे प्रदेश उपाध्यक्ष तथा युवा नेते ऋतुराज हलगेकर, रा.काँ. च्या महिला जिल्हाध्यक्षा शाहीन भाभी हकीम, प्राचार्य समशेरखान पठाण, प्राचार्या लीना हकीम, प्रा.जहीर (छोटूभैय्या )हकीम, प्रा.अस्मा हकीम, मुख्याध्यापक मकसूद शेख, मुख्याध्यापिका जहिरा शेख, प्राचार्य शैलेंद्र खराती, मुस्ताक हकीम आदी मान्यवर विराजमान होते.
उदघाटनीय स्थावरून पुढे बोलतांना आमदार धर्मराव बाबा आत्राम म्हणाले की, शिक्षण हे पावित्र्य क्षेत्र असून बबलू हकीम यांनी स्वतः मुख्याध्यापक पदाची जबाबदारी सांभाळून वनवैभव शिक्षण मंडळाची धुरा चोख व सक्षमपणे सांभाळत आहेत ही अभिमानाची बाब असून आता ते सेवानिवृत्त झाले जीवनाच्या ‘सेकंड इनिंगसाठी’ आता शैक्षणिक क्षेत्रासोबतच राजकीय व सामाजिक क्षेत्रात नवी उभारी घ्यावे असे शुभेच्छा व आशावाद व्यक्त करून बबलू भैय्या हकीम यांच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकले.
यावेळी सत्कारमूर्ती बबलू भैय्या हकीम, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा भाग्यश्रीताई आत्राम, शाहीन भाभी हकीम, प्राचार्य समशेरखान पठाण, प्राचार्य बिधान बेपारी, प्राचार्य रणजित मंडल, प्राचार्या लीना हकीम, प्रा.राजेंद्र उरकुडे, प्राचार्य गजानन लोनबले, प्रा.जहीर हकीम, डॉ.लुबना हकीम, पुंडलिक कविराजवार आदींनी आपले मनोगत व्यक्त केले.
तत्पूर्वी संस्थेच्या वतीने राष्ट्रीय पक्षी असलेले सोन्यानी मळविलेले आकर्षक व देखणी ‘मोरची’ प्रतिकृती व आकर्षकरित्या फ्रेम केलेले ‘मानपत्र’ सुद्धा आ.धर्मराव बाबा आत्राम यांच्या शुभहस्ते भेट देऊन बबलू भैय्या हकीम व शाहीन भाभी हकीम यांचे सपत्नीक भावपूर्ण सत्कार करण्यात आले.
तसेच मान्यवरांच्या शुभहस्ते बबलू भैय्या हकीम यांच्या जीवन कार्यावर आधारित ‘ज्ञानवैभव’ या पुस्तकाचे शाही थाटात विमोचन करण्यात आले.
समारंभाचे प्रास्ताविक प्राचार्य शैलेंद्र खराती यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा.डॉ.राजकुमार मुसने व किशोर पाचभाई यांनी केले उपस्थितांचे आभार प्राचार्य विठ्ठल निखुले यांनी मानले. शानदार व मोठ्या दिमाखात सत्कार सोहळा पार पडले.
*बॉक्स*
*राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्राप्त खुर्शीद शेख यांचेही सपत्नीक सत्कार!*
सिरोंचा तालुक्यातील आसरअल्ली येथील जिल्हा परिषद शाळेचे 2021 चे राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्राप्त खुर्शीद शेख यांचेही वनवैभव शिक्षण मंडळाच्या वतीने आमदार धर्मराव बाबा आत्राम यांच्या शुभहस्ते शिक्षक खुर्शीद शेख यांचे सपत्नीक भावपूर्ण सत्कार करण्यात आले.
सत्कारानंतर खुर्शीद शेख यांनी सुद्धा राष्ट्रपती पदक वनवैभव शिक्षण संस्थेचे सर्वेसर्वा अब्दुल रहीम, अब्दुल हकीम (बब्बूजी हकीम) यांच्या हाताच्या स्पर्शाने अजून खऱ्या अर्थाने नवी ऊर्जा व ताकद प्राप्त होईल म्हणून पदकाला(मानचिन्ह) स्पर्श करवून घेतले. आणि वनवैभव शिक्षण संस्था ही शून्याला विश्व निर्माण करण्याची संधी प्राप्त करून देणारी एकप्रकारे हिऱ्याची खाणच असल्याचे खुर्शीद शेख यांनी सूचक वक्तव्य केले.
————******————-
*आमदार धर्मराव बाबा यांचे हटके लूक!*
‘जबरदस्त इन्ट्री’
सत्कार समारंभाच्या कार्यक्रमात आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी ‘साऊथीयन लूक’ (तामील कर्नाटकीयन) वेष परिधान करून आल्याने आमदार धर्मराव बाबा आत्राम हे आकर्षक व वेषभूषेचा लूक चर्चेचा विषय ठरले होते.
इंडियन फंक्शन हॉल ला आमदार धर्मराव बाबा आत्राम व माजी जि. प.अध्यक्ष भाग्यश्रीताई आत्राम यांची ‘इन्ट्री’ होताच बबलू भैय्या हकीम व शाहीन भाभी हकीम यांनी फुलझडी, म्युझिक व टाळ्यांच्या गजरात शानदारपणे व्यासपीठावर घेऊन गेले हे विशेष!