बारा वर्षीय बलिकेचा विनयभंग ; आरोपी ताब्यात ; गोंडपिपरी तालुक्यातील घटना

14

राजू ( राजेंद्र ) झाडे
गोंडपीपरी तालुका प्रतिनिधी
मो नं 9518368177

गोंडपीपरी :-घरात एकटी असलेल्या बारा वर्षीय बलिकेचा विनयभंग करणाऱ्या चाळीस वर्षीय विवाहित पुरुषाला पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. ही घटना गोंडपिपरी तालुक्यातील विठ्ठलवाडा येथे घडली.आरोपी विरोधात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तालुक्यातील विठ्ठलवाडा येथिल सुधाकर अवथरे ( वय 40 ) असे आरोपीचे नाव आहे.

पोलीस सूत्रानी दिलेल्या माहीतीनुसार , मंगळवारला दुपारी एक वाजताचा सुमारास सदर बलिकेचा विनयभंग करत अत्याचार करण्याचा प्रयत्न अवथरे याने केला.व्यक्तीगत कामानिमित्त पिडीतेचा आई- वडील बाहेर गावी गेले होते.पिडीतेला घरात एकटे बघून आरोपीने विनयभंग केला.घडलेला प्रकार पिडीतेने कुटूंबियांना सांगितला. वडिलांनी गोंडपीपरी पोलीस स्टेशन गाठले.अनतक्रार दाखल केली. ठाणेदार जीवन राजगुरू यांच्या मार्गदर्शनाखाली पी. एस. आय.धर्मराज पटले यांनी बाल लैंगिक अत्याचार संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. दरम्यान पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. वैद्यकीय तपासणीनंतर त्याची कोठडीत रवानगी करण्यात आली. मुल येथील पॉस्को पथकाचे प्रमुख रामटेके मॅडम या प्रकरणी तपास करीत आहेत.