म्युनिसिपल बँकेच्या जाचक अटींच्या विरोधात सभासद कामगारांची निषेध निदर्शने

गुणवंत कांबळे प्रतिनिधी मुंबई
मो.नं.९८६९८६०५३०
मुंबई दि. २२/०९/२०२१.
दि.म्युनसिपल को.ऑप.बँक लि. या महानगरपालिकेच्या बँकेने सभासदांच्या कर्जा संबंधी घातलेल्या जाचक अटींच्या निषेधार्थ बँकेचे सभासद असलेल्या कामगारांनी आज बँकेच्या जी – उत्तर विभागातील शाखेसमोर निषेध निदर्शने केली.
त्याचबरोबर सदर जाचक अटी म्हणजेच सभासदांनी घेतलेले कर्ज मुदतपूर्व परतफेड करावयाचे असल्यास आकारण्यात येणारा दंड त्वरित रद्द करण्यात यावा, कर्जा च्या मुदतीचा कालावधी कमी करावा तसेच कर्जा वरिल व्याजदर कमी करण्यात यावा इत्यादी मागणी चे निवेदन यावेळी सभासदांनी शाखा व्यवस्थापक यांना दिले.
सदर निदर्शनामध्ये रिपाई चे नेते सिद्धार्थ कासारे, कामगार नेते मनोहर सकपाळ, मनोज सागरे, रुपेश पुरळकर, विठ्ठल मोरे, संजय मिटाभाई, अमित लोट, अमित गमरे, आर.आर.कांबळे, संजय पवार, विनोद हळदे, आनंद पवार व संदिप जाधव इ. विविध संघटनांचे पदाधिकारी व कामगार उपस्थित होते.