स्वताचे पाप लपविण्याचा हा शुध्द पोरखेळपणा ; काँग्रेसने साधला सातपुतेंवर निशाना

19

राजू ( राजेंद्र ) झाडे
गोंडपीपरी तालुका प्रतिनिधी
मो नं 9518368177

गोंडपीपरी :-” त्या ” मारहाणीशी काँग्रेसचा नेत्यांचा काही सबंध नाही.ज्याला मारहाण झाली तो काँग्रेसचा कार्यकर्ता नाही.असे असतांना दिपक सातपुते यांनी काँग्रेसचे नाव घेतले.स्वताचे पाप लपविण्याचा हा शुध्द पोरखेळपणा आहे.गावातील प्रकरणाला राजकीय रंग देण्याचा डाव सातपुते करीत असल्याचा आरोप गोंडपिपरी काँग्रेसचे अध्यक्ष तुकाराम झाडे यांनी केला आहे.

सोनापूर येथिल गावकर्याला मारहाण केल्याचा आरोप भाजपाचे माजी सभापती दिपक सातपुते यांच्यावर लावला गेला.सातपुतेनी आज पत्रकार परिषद घेतली.आरोपाचे खंडन करतांनाच सातपुतेनी काँग्रेसवर निशाना साधला.माझा वाढता प्रभाव विरोधकांना बोचत आहे.त्यामुळे मला बदनाम करण्याचे कारस्थान आजूबाजूच्या काँग्रेस नेत्यानी चालविल्याचा आरोप सातपुतेनी केला. यावर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष तुकाराम झाडे यांनी मिडिया वार्ता न्यूजशी बोलतांना म्हटले की ” त्या मारहाण प्रकरणाशी कोणत्याच काँग्रेस नेत्याचा सबंध नाही.असे असतांना सातपुतेनी आरोप केला.हा पळकुटपणा असून पाप लपविण्याचा आटापिटा आहे.चौकशीत सत्य समोर येईलच.”
दरम्यान मारहाण प्रकरणाने भाजप-काँग्रेस आमने सामने उभी झाली आहे.