नागपुरात शिक्षणाचा स्तुत्य उपक्रम : हजारो गरीब मुलांना फूटपाथवरच शिक्षण.

17

नागपुरात शिक्षणाचा स्तुत्य उपक्रम : हजारो गरीब मुलांना फूटपाथवरच शिक्षण.

नागपुरात शिक्षणाचा स्तुत्य उपक्रम : हजारो गरीब मुलांना फूटपाथवरच शिक्षण.
नागपुरात शिक्षणाचा स्तुत्य उपक्रम : हजारो गरीब मुलांना फूटपाथवरच शिक्षण.

✒ युवराज मेश्राम ✒
नागपुर जिल्हा प्रतिनिधी
9923296442
नागपूर:- आज सर्वीकडे शिक्षणाचे खाजगीकरण झाल्यामुळे गरीब मुलाचे शिक्षणाचे दार बंद करण्यात आले. त्यामूळे अनेक गरीब मुल आज शिक्षणा पासुन वंचित राहत असल्याचे सर्वीकडे चित्र दिसून येत आहे. पण काही सामाजिक संघटना आणि कार्यकर्ते हे नेहमी अशा गरीब मुला साठी धावून येत आहे आणि गरीब मुलांना पण शिक्षण देऊन मुख्य प्रवाहात आणण्यासाठी धळपळत आहे.

‘आपण किती जगलाे यापेक्षा कसे जगलाे आणि जाताना जगाला काय देऊन गेलाे’, हे जास्त महत्त्वाचे ठरत. ‘उपाय’ या सामाजिक संस्थेने नुकताच आपला 12 वा स्थापना दिवस विविध उपक्रम राबवून साजरा केला. फूटपाथवर वाढलेल्या, जगलेल्या, शाळेची इमारतही न पाहिलेल्या निरागस मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी धडपडण्याचा ताे वर्धापन दिन हाेय. नागपूर जिल्ह्यातील माैद्यात येथे सुरू झालेल्या फूटपाथ स्कूलचे राेपटे वटवृक्ष बनून देशभरात रुजविण्याचा आणि 11000 मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात नेण्याचा हा प्रवास आहे. ताे जेवढा अतुलनीय तेवढाच मानवीयही आहे.

नागपुर जिल्हातील एनटीपीसी माैदा येथे अभियंता पदावर कार्यारत असलेले वरुण श्रीवास्तव यांना शाळेत न जाणा-या भटकणाऱ्या मुलांना पाहून काहीतरी करण्याची इच्छा झाली. काेण काय म्हणेल, असा मागचा-पुढचा विचार न करता त्यांनी त्यांच्या घरापर्यंत जाऊन शिकविणे सुरू केले. त्यांचे अनुकरण करून काही संवेदनशील तरुण त्यांच्याशी जुळले आणि नागपुरात महाराजबाग राेडवर खेळणी विकणाऱ्यांच्या मुलांसाठी पहिली फूटपाथ शाळा सुरू झाली. महाविद्यालयीन, नाेकरीपेशा तरुण येथे सायंकाळी येऊ लागले आणि या मुलांसाेबत वेळ घालवून त्यांना बाराखडीचे धडे देऊ लागले. पाहता-पाहता अनेक तरुण जुळत गेले. मग माऊंट राेड, पागलखाना चाैक, सक्करदरा, वर्धमाननगर, लक्ष्मीनगर असे एक-एक करीत नागपूर मधील 11 फूटपाथ स्कूल शहरात सुरू झाले. शिक्षण फूटपाथपर्यंत या मुलांना शाळांपर्यंत पाेहोचविण्याचे कामही या तरुणांनी केले. या काळात वरुण यांच्या शिकविण्याने 10 वीपर्यंत गेलेल्या मुलांनी त्यांच्या गावी शाळा सुरू केल्या. असे ११ सेंटर माैद्याच्या आसपासच्या गावात आज सुरू आहेत.

नागपुर मधून सुरु झालेली फूटपाथ स्कूल आता नागपूरपुरती मर्यादित राहिली नाही. तिचे आता वटवृक्षात रुपांतरण झाल. पुण्यातील तरुणांनी ‘उपाय’ संस्थेशी जुळून तेथे केंद्र सुरू केले. पुढे गुडगाव, बंगलोर, दिल्ली व आता मध्यप्रदेशच्या गादरबारा येथे फूटपाथ शाळा सुरू झाली. असे 40 फूटपाथ स्कूलचे केंद्र आज देशभ-यात कार्यरत आहे 250 च्यावर स्वयंसेवक मुलांना शिकविण्याचे काम करतात. या फूटपाथ शाळांमधून 12 वर्षांत 11 हजारच्या वर मुले शिक्षण घेऊन मोठी झाली आहे. त्यात अनेक मुल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत आहेत, काही उच्च शिक्षणापर्यंत पाेहोचली व काही नाेकरीवरही लागली. काही खेळांमध्ये उल्लेखनीय ठरली आहेत.

काेराेना काळातही सेवा
काेराेनाकाळात ‘उपाय’च्या कार्यकर्त्यांनी 35 हजार लाेकांना अन्नधान्य पुरवठा केला. 600 लाेकांचे लसीकरण केले. 730 लाेकांना वैद्यकीय सुविधा पुरविली. 10 ऑक्सिजन सहायता केंद्र चालविले
देशात आठ दशलक्ष मुले शाळेच्या बाहेर समाजाच्या मुख्य प्रवाहापासून दूर आहेत. कुणीतरी जबाबदारी घेतली तर एक-एक मुलगा शिक्षणाच्या प्रवाहात येऊ शकताे. ही मुले शाळेत जाऊ शकत नाही तर शाळा त्यांच्यापर्यंत पाेहोचविता येते. थाेडा विचार करून या निरागस मुलांसाठीही वेळ काढायला हवा.
– वरुण श्रीवास्तव, संस्थापक, ‘उपाय’