घुग्घुस येथील पोळा मैदाना जवळील कचरा डेपो हटावा
वार्ड वासियांची मागणी

वार्ड वासियांची मागणी
पंकज रामटेके
घुग्घुस प्रतिनिधी
मो.८४८४९८८३५५
गुरूवार 23 सप्टेंबर रोजी घुग्घुस येथील कॉलरी नं. 2 पोळा मैदाना जवळील कचरा डेपो हटविण्याची मागणी येथील वार्ड वासियांनी मुख्याधिकारी अर्शीया जुही यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
कॉलरी नं. 2 येथील विहाराच्या बाजूला सुरु असलेला कचरा डेपो हटविण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे. या ठिकाणी नागरिक ये-जा करीत असतात सध्या साथीच्या रोगाचे दिवस सुरु आहे त्यामुळे रोगराई पसरण्याची शक्यता आहे. घाणीमुळे मोठ्या दुर्गंधीचा सामना शेजारील नागरिकांना करावा लागत आहे. त्यामुळे वार्ड वासियांनी निवेदन देऊन येथील कचरा डेपो हटविण्याची मागणी केली आहे. याप्रसंगी मुख्याधिकारी अर्शीया जुही यांनी ही समस्या लवकर निकाली काढणार असल्याचे वार्ड वासियांना सांगितले.
निवेदन देतांना माजी सरपंच लक्ष्मी चांदेकर, निळा चिवंडे, कविता परागे, सीमा दुर्गमवार, किरण सलामे, शाम आगदारी, विकास बारसागडे उपस्थित होते.