बल्लारपूर सरदार पटेल वार्डातील विविध समस्यां साठी मुख्याधिकारी यांना निवेदन

सौ.हनिशा दुधे
तालुका प्रतिनिधी बल्लारपूर
मीडिया वार्ता न्युज चंद्रपूर
मो 9764268694
बल्लारपूर :- सरदार पटेल वार्डातील विविध समस्या असल्याने या समस्येवर तोडगा काढण्यासाठी युवक कॉंग्रेस प्रदेश महासचिव मा. श्री. शिवानी ताई वडेट्टीवार जी, चंद्रपूर जिल्हा युवक कॉंग्रेस प्रभारी मा. इरशाद दादा शेख जी, जिल्हा अध्यक्ष युवक कॉंग्रेस चंद्रपूर मा. हरीश कोत्तावार जी, यांच्या मार्गदर्शनात बल्लारपुर विधानसभा युवक कॉंग्रेस चे कार्यध्यक्ष मा. राजेश नक्कावार जी यांच्या नेतृत्वात मुख्याधिकारी नगर परिषद बल्लारपूर यांना निवेदन दिले.
या निवेदनात स्थानिक सरदार पटेल वार्डातील सवारी बंगला जवळील हनुमान मंदिरातील गट्टू लावने ,जेष्ठ नागरिकांना बसन्या करीता बेंच ची व्यवस्था करणे. रामचंद्र ओदेलु गुडिकंदुला यांचे घरा पासुन तर हरीकेश पेरका यांच्या घरा पर्यंत नळाची पाईप लाईन चे खोदकामाचे काम केले असुन अजूनही ते दुरुस्ती करुन गट्टू लावलेले नाही ते दुरुस्ती करुन गट्टू लावणे सततधार पावसाने तुडुंब भरलेल्या व कचरा व घान असलेल्या नाल्याची साफसफाई करण्यात यावी,जेणेकरून डेंगु ,मलेरीया या बिमारी पासुन नागरीकांची सुरक्षा होईल. राजन्ना सिक्का यांचे घरापासून तर वेणू ईंजापुरी यांचे घरा पर्यंत अंडर ग्राऊंड नाली करण्यात यावे या मागणी साठी निवेदन देण्यात आले.यावेळी प्रमुख उपस्थित बल्लारपूर महिला कॉंग्रेस शहर अध्यक्षा एडवोकेट मेघा भाले जी, व माजी तालुका अध्यक्ष NSUI जीशान सिद्दीकी, हुसैन सिद्दीकी, राजा पेरका, वेणु इंजपूरी, पवन कलवल, शेखर पेरका, श्रीकांत पेरका, शिवा, श्रीमती शांति गूगलोत, सौ.सपना अड्डूरी, सौ.आइशा इंजपूरी तथा इतर कार्यकर्त्ता उपस्तिथि होते।