पत्नीच्या प्रेमात होतं होता अडथडा म्हणून म्हणून पत्नीने काढला पतीचा काटा दिली 3 लाखाची सुपारी

58

त्रिशा राऊत
चिमूर तालुका प्रतिनिधी
मिडीया वार्ता न्यूज चंद्रपूर
Mo 9096817953

नागपूर : सविस्तर वृत्त याप्रमाणे आहे की, नागपूर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील प्रॉपर्टी डीलर प्रदीप बागडे यांचा मृतदेह आढळून आला होता. याप्रकरणी पोलिस तपासात होते. मात्र, प्रदीप बागडे यांच्या पत्नीनेच हत्येची सुपारी दिल्याचॆ पोलिस तपासात उघडकीस आले आहे. या प्रकरणावरुन बागडे यांची पत्नी आणि तिच्या मित्राला नागपूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, प्रदीप बागडे यांच्या एका प्लॉटवर पवन चौधरी हा चायनिजचा व्यवसाय करत होता.
तसेच बागडेंच्या येथे कारवॉशिंगचाही व्यवसाय करत होता.
प्रदीप बागडे आणि त्यांची पत्नी सीमा बागडे यांच्यात सतत वाद होत होता.
सीमा आणि पवन चौधरी यांच्यात मैत्रीपूर्व संबंध जुळले.
यानंतर पत्नी सीमाने आपल्या पतीचा काटा काढण्याचा कट रचला.
तर पतीच्या हत्येसाठी सीमाने पवन चौधरीला 3 लाखाची सुपारी दिली.
त्यानंतर चौधरी याने प्रदीप बागडे यांचे कारमधून अपहरण करुन हत्या केली.
यानंतर त्यांचा मृतदेह हा सावनेर तालुक्यात जंगलात फेकून दिला.
पोलिसांच्या चौकशीत पवन याने जमीनीच्या वादातून हत्या केल्याचं सांगितलं.
पंरतु, पोलिसी खाक्या दाखवताच पवनने घडलेला प्रकार सांगितला.
हत्येची सुपारी देण्याचं उघड होताच पोलिसांनी प्रदीप यांची पत्नी सीमा हिला अटक केली.
दरम्यान, हत्या प्रकरणात पवन चौधरी याला त्याच्या एका मित्राने मदत केली असल्याचीही माहिती समोर येत आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलिस पथक करीत आहेत.