घुग्घुस नगर परिषद तर्फे माझी वसुंधरा अभियानात पॉलिथीन जप्त
दुकानात पॉलिथीन आढळून आल्यास होणार दंडात्मक कारवाई

दुकानात पॉलिथीन आढळून आल्यास होणार दंडात्मक कारवाई
पंकज रामटेके
घुग्घुस प्रतिनिधी
मो.८४८४९८८३५५
घुग्गूस नगर परिषद कार्यालय सर्वेक्षण 2022 आणि माझी वसुंधरा अभियान दिनांक 21 सप्टेंबर ते 24 सप्टेंबर या कालावधीत श्रम दान व स्वच्छ्यता मोहीमे अंतर्गत शहरात साफसफाई, वृक्ष लागवड,विना परवानगी लावलेले पोस्टर,(बॅनर)फलक काढण्यात आले तर मोहिमेच्या शेवटच्या दिवशी नगर परिषेदच्या कर्मचाऱ्यांनी मुख्याधिकारी आर्शीया जुही यांच्या आदेशानुसार बाजारात फिरून दुकानातून पॉलिथीन जप्त करून मोहीम राबविण्यात आली.व यानंतर पॉलिथीनचा दुकानात वापर केल्याचे आढळून आल्यास दहा हजार रुपयाचा दंड वसूल करण्यात येणार असल्याचे सांगितले यावेळी नगर परिषेदचे विठोबा झाडे,शंकर पचारे,हरी जोगी व इतर कर्मचारी उपस्थित होते.