सातव्या वेतन आयोगा मधील वेतन त्रुटीच्या नीराकरणा संदर्भात विमाशीचे सहकार्यवाह यांना दिले निवेदन. – सातवा वेतन आयोग वेतन त्रुटी कृतीसमितीच्या पाठीशी वी.मा.शी.खंबीरपणे उभे राहणार. – सुधाकर अडबाले – सातवा वेतन आयोग वेतन त्रुटी कृती समिती आक्रमक.

53

सातव्या वेतन आयोगा मधील वेतन त्रुटीच्या नीराकरणा संदर्भात
विमाशीचे सहकार्यवाह यांना दिले निवेदन.
– सातवा वेतन आयोग वेतन त्रुटी कृतीसमितीच्या पाठीशी
वी.मा.शी.खंबीरपणे उभे राहणार.
– सुधाकर अडबाले
– सातवा वेतन आयोग वेतन त्रुटी कृती समिती आक्रमक.

सातव्या वेतन आयोगा मधील वेतन त्रुटीच्या नीराकरणा संदर्भात विमाशीचे सहकार्यवाह यांना दिले निवेदन. - सातवा वेतन आयोग वेतन त्रुटी कृतीसमितीच्या पाठीशी वी.मा.शी.खंबीरपणे उभे राहणार. - सुधाकर अडबाले - सातवा वेतन आयोग वेतन त्रुटी कृती समिती आक्रमक.
सातव्या वेतन आयोगा मधील वेतन त्रुटीच्या नीराकरणा संदर्भात
विमाशीचे सहकार्यवाह यांना दिले निवेदन.
– सातवा वेतन आयोग वेतन त्रुटी कृतीसमितीच्या पाठीशी
वी.मा.शी.खंबीरपणे उभे राहणार.
– सुधाकर अडबाले
– सातवा वेतन आयोग वेतन त्रुटी कृती समिती आक्रमक.

✍संतोष मेश्राम✍
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
( ग्रामीण )-9923497800

राजुरा सविस्तर वृत्त खलील प्रमाणे आहे
सहाव्या वेतन आयोगा मध्ये नवनियुक्त प्राथमिक शिक्षकांना शिक्षण सेवक कालावधी पूर्ण केल्यानंतर पाच हजार दोनशे ते वीस हजार दोनशे ग्रेट पे दोन हजार आठशे ही वेतनश्रेणी मिळत होती. प्राथमिक शिक्षकांना पदोन्नतीच्या संधी नसल्याने बारा वर्षाच्या नियमित सेवा कालावधीनंतर चट्टोपाध्याय समितीने शिफारस केलेली वरिष्ठ वेतन श्रेणी दिली जायची. त्यामुळे मूळ वेतनात वाढ होऊन 9300 ते 34800 ग्रेड पे 4200 ही वेतन श्रेणी मिळत होती. म्हणजेच मूळ वेतनात ग्रिट पे मध्ये चौदाशे रुपयांची वाढ होत होती जी वार्षिक वेतनवाढीच्या सुमारे तिप्पट होती.
शासनाने 1 जानेवारी 2016 पासून सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाचा लाभ दिला. त्यावेळी सहाव्या वेतन आयोगाचे बीसी सातव्या वेतन आयोगा मध्ये रुपांतरीत करताना बेसिक गुणिले 2.57 हा फार्मूला वापरला. त्यामुळे 1 जानेवारी 2016 पूर्वी ज्या शिक्षकांना बारा वर्षे पूर्ण झालेली आहेत त्यांच्या वेतनात ग्रेड पे मधील फरक 1400 गुणिले 2.57 म्हणजेच 3598 रुपये इतकी वाढ झाली. मात्र 1 जानेवारी 2004 नंतर सेवेत आलेल्या म्हणजेच 1 जानेवारी 2016 नंतर बारा वर्षे पूर्ण होणाऱ्या शिक्षकांच्या बाबतीत सातव्या वेतन आयोगा मध्ये फार मोठा अन्याय झाला आहे. कारण सातव्या वेतन आयोगाने ग्रेड पे ही संकल्पना बंद करून तपे मॅट्रिक्स ही संकल्पना आणली. सातव्या वेतन आयोगाच्या अधिसूचनेमधे चट्टोपाध्याय समितीने शिफारस केलेल्या वरिष्ठ वेतन श्रेणी बाबत कोणताही स्पष्ट उल्लेख केला गेलेला नाही. त्यामुळे मूळ वेतनात जेष्ठ शिक्षकांप्रमाणे 3598 रुपये इतकी वाढ अपेक्षित असताना ती फक्त सातशे रुपये इतकीच होत आहे. जी अत्यंत तोकडी, अपेक्षेपेक्षा पाचपट कमी आणि वार्षिक वेतन वाढीच्या अर्धी इतकीच आहे. सातवा वेतन आयोगात दरमहा नुकसानीचा फटका बसणारे शिक्षक आधीच जुनी पेन्शन योजनेला मुकले असताना अशा वेळी निर्माण झालेल्या या गंभीर अशा वेतन त्रुटीमुळे हक्काचे वेतन डावलले गेल्याच्या भावनेने शिक्षकांवर नाउमेद होण्याची वेळ आलेली आहे. शिक्षकांच्या वेतन निश्चिती बाबतचा अन्याय दूर होण्यासाठी शिक्षण, ग्रामविकास, नगरविकास तसेच वित्त विभागाकडे 1 जानेवारी 2004 नंतर सेवेत आलेल्या शिक्षकांसाठी किमान सहाव्या वेतन आयोगाप्रमाणे वरिष्ठ वेतन श्रेणीचा लाभ देण्यासाठी प्रस्ताव सादर करावा आणि योग्य न्याय मिळवून द्यावा याकरिता विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे सहकार्यवाह सुधाकर अडबाले यांना सातवा वेतन आयोग वेतन त्रुटी कृती समिती जिल्हा चंद्रपूर च्या वतीने निवेदन देण्यात आले. हे निवेदन देताना कृती समिती सदस्य पी.एन. वैरागडे, एल. टी.मडावी, डी. एल. निमकर, पी. एस. मेंढे, ए. एस. चिडे, डी. टी. चिंतलवार, एन. आर. नुगुरुवार, ए. टी. मडावी, एस. डी. कांबळे, एस. डी. परचाके, एस. डी. निखाडे, बी. एन. बेले, आर. आर. चिडे, जे. पी. साळवे, एम. पी. मेश्राम, आर. पी. जुनघरे, एन. बी. काळे, आर. आर. पेंदोर, आदींची उपस्थिती होती.