दारव्हा शहरातील सामाजिक बांधिलकी जपनारे एकमेव ओम गणेश मंडळ

✒साहिल महाजन✒
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी
📱93097 47836📱
दारव्हा ; -दारव्हा शहरातील ओम गणेश मंडळ, मागील काही वर्षा पासुन संपुर्ण महाराष्ट्र मध्ये नावलोकीक असे मंडळ, मागील वर्षी चक्क २ इंच उंचीचे गणेश बाप्पाची स्थापना करुन संपुर्ण महाराष्ट्रात सर्वात लहान गणपती असण्याचा विक्रम नोंदविल्या नंतर या वर्षी सुद्धा कोविड लसीवर विराजमान फक्त ९ इंच उंचीची गणेश मुर्ती स्थापण करुन मुर्ती लहान पण किर्ती महान असे करुन दाखवनारे ओम गणेश उत्सव मंडळ अंबिका नगर दारव्हा ची दखल संपुर्ण वर्तमान पत्र व न्युज चॅनलनी घेतली आहे
ओम गणेश मंडळ दरवर्षी काहीतरी सामाजिक व ज्वलंत प्रश्नावर आधारित उपक्रम राबवितात या वर्षी सुद्धा कोविड लसीवर विराजमान गणपती बाप्पा ची सुबक अशी मर्ती स्थापन केली. नायब तहसीलदार सुनिल सरागे यांच्या हस्ते श्री गणेशाची प्राण प्रतिष्ठा करण्यात आली विद्याथ्यान साठी नेत्रतपासणी शिबीर, नागरीकान करिता लसीकरण शिबीर राबविले, म़डळाच्या कार्यकरत्यानी नेत्रदानाचा संकल्प केला दरम्यान मुकबधीर चित्रकार राजु राठोड याचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आले.
मंडपाच्या समोर टपा मध्ये पर्यावरण पुरक गणेश विसर्जन करण्यात आले यावेळी डॉ. विक्रमसिंह कदम(वैद्यकीय अधिक्षक), सुभाष जाधव (तहसीलदार), ज्ञानेश्वर धोत्रे साहेब (पोलीस निरीक्षक), सुनील सरागे (ना.तहसीलदार), चंद्रशेखर पुसनाके (तलाठी), गीरी साहेब (तलाठी) साहेबराव राऊत(सफाई कामगार) उपस्थित होते हे मुख्य कोरोना योद्धा असुन यांच्या मंडळाच्या वतिने पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले.
मंडळाचे अध्यक्ष जिवन काळे,उपाध्यक्ष संदिप शिले,सचिव स्वप्ऩिल राठोड,कोषध्यक्ष प्रविण राऊत,विलास शिले,अमोल ठोंबरे, महेश दंडे, निखील मडसे, किशोर राऊत,ऋषिकेश गोटे,गौरव डोमाळे,अमोल राठोड विधीसल्लागार ॲड. नितीन जवके,ॲड. सचिन गोरले मार्गदर्शक सुनिलभाऊ आरेकर आदी सदस्यानी परिश्रम घेतले