कंगना विरोधात कर्नाटकात गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे निर्देश*

64

*कंगना विरोधात कर्नाटकात गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे निर्देश*

प्रसिद्ध अभिनेत्री आणि आपल्या उलटसुलट वक्तव्यांनी सतत केंद्र सरकारची पाठराखण करणाऱ्या कंगना राणावत यांना आणखी एक धक्का बसला आहे.

शेतकरी आंदोलकांना थेट दहशतवादी म्हणणाऱ्या कंगना यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.

वकील आणि शेतकरी पुत्र असलेल्या रमेश नाईक यांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही करण्यासाठी न्यायालयाचे दार ठोठावले होते.

त्यानुसार कर्नाटक राज्यातील तुकमुर जिल्ह्यातील प्रथम श्रेणीचे न्यायिक मजिस्ट्रेट (जेएमएफसी) यांच्यासमोर याप्रकरणी सुनावणी झाली.

त्यात कंगना यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश न्यायालयाने दिलेले आहेत.