दिग्रसच्या सहा गणेश मंडळांवर गुन्हे दाखल

16

दिग्रसच्या सहा गणेश मंडळांवर गुन्हे दाखल

दिग्रसच्या सहा गणेश मंडळांवर गुन्हे दाखल
दिग्रसच्या सहा गणेश मंडळांवर गुन्हे दाखल

राम राठोड
तालुका प्रतिनिधी
✍🏻9422160416✍🏻

श्रीगणेश विसर्जनाला म्हणजेच अनंत चतुर्थीच्या दिवशी परंपरागत पध्दतीने शहरात शांततेत व पोलिसांच्या बंदोबस्तामध्ये सायंकाळी सात वाजेपर्यंत बाप्पांचे विसर्जन जल्लोषात पार पडले.
गणेशभक्तांच्या भावनेचा आदर व कोविड शून्य परिस्थिती असल्याने शहरातील सहा गणेश मंडळांनी स्थापना मंडप पासून ते विसर्जन स्थळापर्यंत वाजत गाजत जल्लोषात बाप्पांना निरोप दिला.त्यामुळे विसर्जन मार्गावर मिरवणुकीचे स्वरूप आल्याचा व जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत दिग्रस पोलिसांनी सहा गणेश मंडळांवर गुन्हे दाखल केले आहे.
याच विसर्जन मिरवणुकीत शहरातील देवनगर भागातील दोन गणेश मंडळांनी दिग्रसकरांना लोकनृत्याची मेजवानी दिली. मिरवणुकीचे स्वरूप आल्याचा ठपका व जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची पायमल्ली केल्याचे सांगत दिग्रस पोलिसांनी सार्वजनिक गणेश मंडळ, सार्वजनिक नवयुवक गणेश मंडळ,छत्रपती चौकाचा राजा गणेश मंडळ, शिवसम्राट गणेश मंडळ, अष्टविनायक गणेश मंडळ, युवा गणेश मंडळ या सहा गणेश मंडळांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केले.त्यामुळे गणेश मंडळच्या कार्यकर्त्यामध्ये नारजीचा सुर निघत.