मीडिया वार्ता न्यूज आयोजित ‘माझा गणपती सुंदर गणपती’ घरगुती गणेशोत्सव स्पर्धेचा निकाल जाहीर.

61
मीडिया वार्ता न्यूज आयोजित “माझा गणपती सुंदर गणपती” घरगुती गणेशोत्सव स्पर्धेचा निकाल जाहीर.

मीडिया वार्ता न्युज

मुंबई दि. २६ सप्टेंबर २०२१: गेल्यावर्षीप्रमाणे यावर्षी हि कोरोना काळात गणेशोउत्सव सर्वत्र साजरा करण्यात आला. कोरोना नियमांचे पालन करत सामाजिक बांधिलीकीचे भान राखत लोकांनी लाडक्या गणपती बाप्पाची मनोभावे पूजा केली. या दरम्यान सुरेख गणेशमूर्तींसह विविध सामाजिक, आरोग्य, शैक्षणिक, नेसर्गिक समस्यांबद्दल जनजागृती करणाऱ्या देखाव्यांची निर्मिती करण्यात आली. त्यासाठी पर्यावरणाला हानी पोहचवणाऱ्या वस्तूंचा वापर टाळून टाकाऊ पासून टिकाऊ सारखे उपक्रम गणेशभक्तांमार्फत राबवण्यात आले. अश्या पर्यावरण पूरक गणेशउत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी मीडिया वार्ता न्युज तर्फे माझा गणपती सुंदर गणपती ह्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ह्या स्पर्धेला महाराष्ट्रभरातून भरभरून प्रतिसाद मिळाल्याने स्पर्धेत सहभागी झालेल्या गणेशभक्तांचे मीडिया वार्ता न्युज खूप आभारी आहे.

माझा गणपती सुंदर गणपती 2021″ घरगुती गणेशोत्सव स्पर्धेचा निकाल

प्रथम क्रमांक: डॉ. मुक्ता सिरसाटे, गोंदिया
मानवाच्या अक्राळ-विक्राळ आधुनिकीकरणाच्या हव्यासापोटी पृथ्वीवर तापमानवाढ आणि धोकादायक हवामान बदल होऊन दुष्काळ, अवेळी पाऊस आणि महापूर सारख्या संकटाना मानवाला सामोरे जावे लागत आहे. तसेच वृक्षतोड, रासायनिक प्रदूषण यांसारख्या मानवनिर्मित समस्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच जात आहे. याबाबत जनजागृती करणारा डॉ. मुक्ता सिरसाटे यांचा गणेशोउत्सवाचा देखावा खरोखरच वाखाणण्याजोगा आहे. विशेष म्हणजे सजावटीसाठी स्वतःच्या हातानी त्यांनी रेखाटलेले चित्रकाम तर अप्रतिम. तसेच पेशाने डॉक्टर असलेल्या मुक्ता सिरसाटे यांच्या सध्याच्या कोरोनाकाळातील रुग्णसेवेच्या कार्याला मीडिया वार्ता न्यूजतर्फे सलाम.

प्रथम क्रमांक: डॉ. मुक्ता सिरसाटे, गोंदिया

 

द्वितीय क्रमांक: समृद्धी पवार, वरळी
कागद आणि पुठ्ठा यांसारख्या इको-फ्रेंडली साहित्यांचा वापर करुन बनलेला आॕक्सिजनचे महत्त्व सांगणारा समृद्धी पवार यांच्या घरचा बाप्पा. शाडूची सुबक गणेशमूर्ती आणि आसपासची सजावट झाडे तोडू नका – झाडे लावा..झाडे जगवा..आपल्या पर्यावरणाचे संरक्षण करा, असा मोलाचा संदेश देत आहे. तसेच कोरोना काळातील नियमाचे भान राखून गणेशमूर्तीचे घरच्या घरीच विसर्जन करण्याचा समृद्धी पवार आणि कुटुंबाचा उपक्रम स्तुत्यच.

द्वितीय क्रमांक: समृद्धी पवार, वरळी

तृतीय क्रमांक: अनंत नामये, विलेपार्ले
सध्याच्या धकाधकीच्या काळात लहान मुलांच्या हरवलेल्या बालपणाची जाणीव करून देणारी विलेपार्ले येथील अनंत नामये यांची बाल उद्यानात विराजमान झालेली गणेशमूर्ती. कोरोनाकाळात लहान मुलांच्या शाळा बंद आहेत, लॉकडाऊन मुळे त्यांना खेळाची मैदान, नेचर पार्क मध्ये जाता येत नाहीत. अश्यावेळी डिजिटल विश्वात गुंतून पडलेल्या लहान मुलांच्या जिवनातील बाहेरच्या निसर्गाचा महत्त्व सांगणारी सुरेख सजावट अनंत नामये यांनी केली आहे.

तृतीय क्रमांक: अनंत नामये, विलेपार्ले

 

पर्यावरण पूरक गणेशउत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी मीडिया वार्ता न्युज तर्फे आयोजित केलेल्या या उपक्रमात सहभागी झालेल्या सर्व गणेशभक्तांचे पुन्हा एकदा आभार. लवकरच विजेत्यांना पारितोषिक आणि सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे. तसेच राजकीय, सामाजिक, शैक्षणिक विषयांवरील सविस्तर बातम्या मिळवण्यासाठी तुम्ही सारे आम्हाला फॉलो कराल अशी मीडिया वार्ता न्युजला आशा असेल.
धन्यवाद.
गणपती बाप्पा मोरया!!!