उध्या भारत बंद आंदोलनात आम आदमी पार्टी चंद्रपुर पूर्ण ताकदीनिशी सहभागी होणार – सुनिल देवराव मुसळे जिल्हाध्यक्ष आम आदमी पार्टी

संदीप तूरक्याल
चंद्रपूर शहर प्रतिनिधी
मिडीया वार्ता न्यूज चंद्रपूर
Mob… 9834024045
चंद्रपूर – २७ सप्टेबर संयुक्त किसान मोर्चाच्या आवाहनानुसार पुकारलेल्या भारत बंदला आम आदमी पार्टीचा सक्रिय सहभाग सर्व शेतकरी प्रेमी जनतेने गांधी चौक येथे 12 वाजता उपस्थित राहण्याचे आम आदमी पार्टी चे आवाहन.
जय जवान जय किसान !
केंद्र सरकारने शेतकऱ्यांना विश्वासात न घेता मंजूर केलेल्या कायद्यांना आम आदमी पार्टीचा विरोध असून त्या विरोधात चाललेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आपण सुरुवातीपासून पाठिंबा दिला आहे. या आंदोलनास एक वर्ष पूर्ण होऊनसुद्धा केंद्रातील भाजप सरकारने शेतकऱ्यांशी चर्चा करून तोडगा काढला नसून भाजपा सरकार कडून हे आंदोलन मोडून काढण्यासाठी कुटील प्रयत्न केले गेले आहेत. आत्तापर्यंत अनेक आंदोलनकर्ते शेतकरी शाहिद झाले असून सुद्धा केंद्र सरकार अत्यंत असंवेदनशील पद्धतीने शेतकऱ्यांशी वागत आहे.
या आंदोलनास एक वर्ष पूर्ण झाले असून केंद्र सरकारचा निषेध करून तीनही कायदे मागे घेण्यासाठी सर्व शेतकरी संघटणानी येत्या सोमवार दिनांक २७ सप्टेंबर २०२१ रोजी देशव्यापी बंद पुकारला आहे. आम आदमी पार्टीचा या बंदला सक्रिय पाठिंबा असून जिल्ह्यातील आप चे कार्यकर्ते व पदाधिकाऱी यात सहभाग नोंदवतील व शेतक-यांच्या हक्काचे हे आंदोलन यशस्वी करतील सर्व नियमांचे पालन करत, संविधानिक मार्गाने या बंद मध्ये सहभागी व्हावे असे आवाहन आप तर्फे प्रसीद्धी पञकाद्वारे करण्यात येत आहे.