सांगली: वहिनी घराशेजारच्या युवका बरोबर चॅटिंग करते म्हणुन; दिराने केली वहीनीची हत्या. हत्येनंतर दिराने वहिनी घराच्या जिन्यावरून पडल्याचा केला बनाव.

52

सांगली: वहिनी घराशेजारच्या युवका बरोबर चॅटिंग करते म्हणुन; दिराने केली वहीनीची हत्या.

हत्येनंतर दिराने वहिनी घराच्या जिन्यावरून पडल्याचा केला बनाव.

सांगली: वहिनी घराशेजारच्या युवका बरोबर चॅटिंग करते म्हणुन; दिराने केली वहीनीची हत्या. हत्येनंतर दिराने वहिनी घराच्या जिन्यावरून पडल्याचा केला बनाव.
सांगली: वहिनी घराशेजारच्या युवका बरोबर चॅटिंग करते म्हणुन; दिराने केली वहीनीची हत्या.
हत्येनंतर दिराने वहिनी घराच्या जिन्यावरून पडल्याचा केला बनाव.

संजय कांबळे✒
सांगली जिल्हा प्रतिनिधी
989009362
सांगली :- सांगली जिल्हातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. घराशेजारी असलेल्या युवकाबरोबर मोबाईलवर फ़ोनच्या मध्यमातुन चॅटिंग केल्याच्या कारणातून एका सनकी दिराने आपल्याच वहिनीची हत्या केल्याचे समोर आल्याने सर्वीकडे एकच खळबळ उडाली आहे. सर्वीकडे संताप व्यक्त करण्यात येत आहे. घरातच हत्या केल्या नंतर दिराने वहिनी घराच्या जिन्यावरून पडल्याचा बनाव केला होता. मात्र पोलिसांच्या तपासात ही हत्या असल्याचं स्पष्ट झालं आहे. पलूस तालुक्यातील बुर्ली येथे गुरुवारी घडलेला प्रकार शनिवारी पोलिसांनी उघडकीस आणला. याप्रकरणी संशयित कुणाल पवार वय 28 वर्ष याला पलूस पोलिसांनी अटक केली आहे. सायली केतन पवार वय 22 वर्ष असं मृतक महिलेचं नाव आहे.

पोलिसांकडुन प्राप्त माहितीनुसार, बुर्ली येथील सायली पवार या विवाहित महिलेने आपल्या घराशेजारी राहणाऱ्या युवकाशी मोबाईल फ़ोनच्या माध्यमातुन चॅटिंग केल्याचा आणि त्याला भेटल्याचा दिर कुणाल याला संशय होता. गुरुवारी रात्री उशिरा सायली ही बेडरूममध्ये एकटी असल्याचं पाहून कुणालने तिच्यावर धारदार शस्त्राने हल्ला चढवला. तिच्या गळ्यावर आणि दोन्ही हातांवर वार केले. यात अतिरक्तस्रावामुळे तिचा मृत्यू झाला. मात्र ती घरात जिन्यावरून पडल्याचा बनाव करत मध्यरात्रीच्या सुमारास तिला उपचारासाठी सांगलीतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं.

दरम्यान, शेजारचा युवक श्रेयश पवार यानेही गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. सायली पवार या विवाहितेचा मृत्यू जिन्यावरून पडून झाल्याचा बनाव संशयिताने केला, मात्र तो उघड झाला. या प्रकरणी संशयित कुणाल पवार यास पलूस पोलिसांनी अटक केली. त्याला न्यायालयाने दि.29 सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.