युवा बौध्द कौशल्य विकास सेवाभावी संस्था, हिंगणघाट च्या वतीने —

53

युवा बौध्द कौशल्य विकास सेवाभावी संस्था, हिंगणघाट च्या वतीने —

युवा बौध्द कौशल्य विकास सेवाभावी संस्था, हिंगणघाट च्या वतीने ---
युवा बौध्द कौशल्य विकास सेवाभावी संस्था, हिंगणघाट च्या वतीने —

आशीष अंबादे ✒
वर्धा जिल्हा प्रतिनिधी
8888630841
मिडीया वार्ता न्यूज वर्धा

२६/०९/२१युवा बौध्द कौशल्य विकास सेवाभावी संस्था, हिंगणघाट च्या वतीने दिनांक 25/09/2021 ला सिद्धार्थ बुद्ध विहार,सिद्धार्थ नगर,हिंगणघाट येथे प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.धम्मनायक सम्राट अशोक यांची प्रतिमा भेट देण्याचा व सम्राट अशोक यांच्या लोककल्याणकारी कार्यावर प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित करून संस्था राबवित असलेल्या व्यवसायिक प्रशिक्षणाच्या उपक्रमाबाबत यावेळी माहिती देण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक मा.अशोकजी भालशंकर,कार्यक्रमाचे अध्यक्ष,मा. मंसारामजी गायकवाड तसेच कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी ऍड.मोहन भस्मे,अजय पागडे, ऍड.कुणाल दुर्गे, बंडूजी मानकर,पत्रकार,महेंद्र लोखंडे, प्रफुल मेश्राम आदी पाहुणे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन,आयु.विजय झाडे,प्रास्ताविक,आयु,मुरलीधर भगत,तर आभार, आयुष्यमती,अर्चनाताई झाडे यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता संदीप नगराळे,बाबाराव फुलकर, निकेश भगत यांनी अथक परिश्रम घेतले.