बल्लरपुरात अपघात होता होता टळला बल्लारपूरात राज्य महामार्गावरील नगर परिषदेच्या विजेच्या पोलला बे धडक देऊन बांबू भरलेला ट्रक पलटला

✍संतोष मेश्राम✍
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
( ग्रामीण )-9923497800
बल्लारपूर सविस्तर वृत्त खलील प्रमाने आहे की
बल्लारपूर शहरात आज सकाळी 8 : 00 वाजताच्या सुमारास न्यू-कॉलोनी च्या बांबू डेपोतुन बांबू भरलेला ट्रक क्रमांक MH 34 AB 4071 चे ब्रेक फेल झाल्यामुळे राज्य महामार्गावरील नगर परिषदेच्या विजेच्या पोलला धडक देऊन पलटी झाला सुदैवाने यावेळी दुसरे कोणतेही वाहन राज्यमहामार्गावर जात नसल्यामुळे जीवित हानी टळली यासोबतच सकाळच्या सुमारास राम मंदिर परिसरात अनेक नागरिक फिरायला जात असतात विशेष बाब म्हणजे न्यू-कॉलोनी कडून राज्य महामार्गावर कडे उतार असल्यामुळे ट्रकचालक डिजल वाचविण्यासाठी विना गेयर गाडी न्यूट्रल करून चालवीत असतात अशा प्रकारातून सदर अपघात घडला आहे.
या संदर्भात अधिक माहितीनुसार सदर अपघात ट्रकचा चालक स्वप्नील खडेकर रा.चामोर्शी असून या अपघातामुळे बांबू रस्त्यावर अस्तव्यस्त पडले होते त्यामुळे काही काळ वाहतूक खोळंम्बली होती मात्र क्रेनच्या अपघातग्रस्त ट्रक ला बाजूला सारून रस्त्यावरील बांबू दुसऱ्या ट्रकमध्ये लोड करण्यात आले.सदर ट्रक मध्यप्रदेशातील लांजी गावातून आणला जातो. बल्लारपूर पेपर उद्योगाद्वारे बांबू डेपो नागरी वस्तीत असल्यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही यामुळे स्थानिक गोकुल नगर वार्डातील नागरिकांची मागणी आहे की न्यू-कॉलोनी परिसरात असलेला बांबू डेपो बल्लारपूर शहराच्या बाहेर स्थापित अपघात मुडे काही काळ वाहतूक खोडबली होती