७५ वे अमृत महोत्सवी वर्ष ,
सिद्धार्थ महाविद्यालय कला,विज्ञान आणि वाणिज्य “माजी विद्यार्थी संघ” (रजि) यांच्या वतीने स्नेहसंमेलन सोहळा संपन्न

सिद्धार्थ महाविद्यालय कला,विज्ञान आणि वाणिज्य “माजी विद्यार्थी संघ” (रजि) यांच्या वतीने स्नेहसंमेलन सोहळा संपन्न
गुणवंत कांबळे,प्रतिनिधी मुंबई
मुंबई : -डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुढाकाराने स्थापन करण्यात आलेल्या सिद्धार्थ महाविद्यालयातुन ७५ वर्षात लाखो विद्यार्थी घडले आहेत सद्या हे विद्यार्थी विविध क्षेत्रात राज्य, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत आहेत.या विद्यार्थ्यांच्या मनात महाविद्यालयाविषयी आपुलकीची भावना आहे.मनात असलेल्या या भावनेला जागा करून देण्यासाठी महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांकडून अमृत महोत्सवी वर्षानिमित्त साधून स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले होते.या स्नेहसंमेलनाला सिद्धार्थ महाविद्यालयाच्या शेकडो माजी विद्यार्थ्यांनी आवर्जून उपस्थित दर्शवली.मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम सिद्धार्थ महाविद्यालयात “बुद्ध भवन” येथे पार पडला.
सिद्धार्थ महाविद्यालय कला, विज्ञान आणि वाणिज्य माजी विद्यार्थी संघ आयोजित महाविद्यालयाच्या या स्नेहसंमेलनात राज्यातील दिग्गज व्यक्तिमत्वांनी हजेरी लावली या कार्यक्रमाला मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू, माजी राज्यसभा खासदार डॉ.भालचंद्र मुणगेकर, ऍड.अशोक तळवटकर आणि डॉ.अशोक सुनतकरी यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
या स्नेहसंमेलनात माजी राज्यसभा खासदार डॉ. मुणगेकरांनी माजी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.तसेच सध्याच्या आंबेडकरी चळवळीच्या सद्यस्थितीवर भाष्य ही केले. काही माजी विद्यार्थ्यांनी भीमगीते आणि सिनेमातील गीते गाऊन स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमात रंगत आणली. तसेच शेकडो माजी विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत सिद्धार्थ महाविद्यालयाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
सांस्कृतिक कार्यक्रम प्रशांत पवार सुशांत जाधव , अजय जाधव, अनिल जाधव यांच्या सहकार्याने सादर झाला.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रोशन कांबळे, प्रा. विजय मोहिते, अमोलकुमार बोधिराज, प्रा. रमेश झाडे, चंद्रमणी दांडगे, रामेश्वर गुरव, निलेश जाधव, संघरत्न झेंडे,प्रतीक साबळे, वैशाली पवार, गोरख उबाळे या कार्यकारणी पदाधिकारी तसेच आकाश लोंढे, तारकेश जाधव, प्रदीप जाधव, दिनेश बोधिराज, सुप्रिया मोहिते, रुपाली खळे, दीपिका आंग्रे, अमेय पाटील, इत्यादींनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली तसेच नॉन टीचीग स्टाफ हाटे सर, विनोद सर, व राठोड सर यांचे मोलाचे सहकार्य लाभले