शांतारामजी पोटदुखे यांचे चंद्रपूरच्या राजकीय, साहित्य, शैक्षणीक आणि सांस्कृतीक क्षेत्रातील योगदान चंद्रपूरकर कधिही विसरणार नाही – आ. किशोर जोरगेवार

57

शांतारामजी पोटदुखे यांचे चंद्रपूरच्या राजकीय, साहित्य, शैक्षणीक आणि सांस्कृतीक क्षेत्रातील योगदान चंद्रपूरकर कधिही विसरणार नाही – आ. किशोर जोरगेवार

शांतारामजी पोटदुखे यांचे चंद्रपूरच्या राजकीय, साहित्य, शैक्षणीक आणि सांस्कृतीक क्षेत्रातील योगदान चंद्रपूरकर कधिही विसरणार नाही – आ. किशोर जोरगेवार
शांतारामजी पोटदुखे यांचे चंद्रपूरच्या राजकीय, साहित्य, शैक्षणीक आणि सांस्कृतीक क्षेत्रातील योगदान चंद्रपूरकर कधिही विसरणार नाही – आ. किशोर जोरगेवार

सौ.हनिशा दुधे
तालुका प्रतिनिधी बल्लारपूर
मीडिया वार्ता न्युज चंद्रपूर
मो 9764268694

चंद्रपूर. स्व. शांतारामजी पोटदुखे यांनी माजी पंतप्रधान दिवंगत पी. व्ही. नरसिंह राव यांच्या मंत्रिमंडळात अर्थ राज्यमंत्री म्हणून काम पाहिले. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून ते चारवेळा निवडून आले. राजकीय, साहित्य, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात त्यांचा सक्रिय सहभाग होता. चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील शैक्षणिक विकासात त्यांचे भरीव योगदान राहिले त्याचे हे योगदान चंद्रपूर कधिही विसरु शकणार नाही असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.
सर्वोदय शिक्षण मंडळाचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी अर्थराज्यमंत्री चंद्रपूरभूषन दिवंगत शांतारामजी पोटदुखे यांच्या तृतीय पुण्यस्मरणानिमीत्य सरदार पटेल महाविद्यालयाच्या स्व. शांतारामजी पोटदुखे सभागृहात आदरांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी कृष्णा वैद्यकीय विज्ञान संस्थेचे मुख्य सल्लागार डाॅ. वेदप्रकाश मिश्रा, सर्वोदय शिक्षण मंडळाच्या अध्यक्ष सुधाताई पोटदुखे, सर्वोदय शिक्षण मंडळाचे सचिव प्रशांत पोटदुखे, उपाध्यक्ष सुदर्शन निमकर, सहसचिव डाॅ. किर्तीवर्धन दिक्षीत, माजी खासदार नरेशबाबू पुगलीया, महापौर राखी कंचर्लावार, गोंडवाना विद्यापीठाचे माजी गुलगुरु डाॅ. वि. सा. आईंचवार, श्यामसुंद धोपटे, रिपाई नेते व्ही. डी मेश्राम, स.वि.विधी महाविद्यालयाच्या प्राचार्या डाॅ अंजली हस्तक, श्रमीक पत्रकार संघाचे अध्यक्ष मजहर अली, महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. पी.एम काटकर, रघूवीर अहिर यांच्यासह इतर मान्यवरांची उपस्थिती होती.
यावेळी पूढे बोलतांना आ. जोरगेवार म्हणाले कि, शांतारामजी पोटदुखे यांची अजातशत्रू म्हणून ओळख होती. मंत्री म्हणून काम करत असतांना त्यांनी चंद्रपूरचे नाव देशाच्या पटलावर पोहचवले. गरीब होतकरू विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यात मदत करण्यापासून तर त्यांचा उत्साह वाढविण्याचे काम त्यांनी केले यासोबतच समाजातील तळागाळातील लोकांना सुध्दा ते नेहमी मदत करायचे या सर्व कार्याची दखल घेऊनच त्यांना गोंडवाना विद्यपीठाचा पहिला आदर्श समाजभूषण पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आले होते. आज ते आपल्यात नसले तरी त्यांचे कार्य आणि विचार सर्दैव समाजाला प्रेरणा देत राहिल असे यावेळी आमदार किशोर जोरगेवार म्हणाले.त्यांच्या तृतीय पुण्यस्मरणानिमीत्य सददार पटेल महाविद्यालयात रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरात रक्तदात्यांनी मोठ्या संख्येने रक्तदान करत शांतारामजी पोटदूखे यांना आदराजंली अर्पण केली. यावेळी येथील शिक्षकांचाही आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला शहरातील मान्यवर, सर्वोदय शिक्षण मंडळाद्वारे संचालीत सर्व महाविद्यालय व शाळेचे प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांची प्रामख्याने उपस्थिती होती.