नागपुरात भरदिवसा चाकूच्या धाकावर 20 लाख लुबाडणाऱ्या चोराला ठोकल्या बेड्या

51

नागपुरात भरदिवसा चाकूच्या धाकावर 20 लाख लुबाडणाऱ्या चोराला ठोकल्या बेड्या

नागपुरात भरदिवसा चाकूच्या धाकावर 20 लाख लुबाडणाऱ्या चोराला ठोकल्या बेड्या
नागपुरात भरदिवसा चाकूच्या धाकावर 20 लाख लुबाडणाऱ्या चोराला ठोकल्या बेड्या

त्रिशा राऊत
चिमूर तालुका प्रतिनिधी
मिडीया वार्ता न्यूज चंद्रपूर
Mo 9096817953

नागपूर : नागपुरात गुन्हेगारी काही थांबतात दिसत नाहीय. भर दिवसा 20 लाख रुपयांची लूट झाल्याने नागरिकांमध्ये धास्तीचं वातावरण निर्माण झालं आहे. इतवारी हा मार्केटचा परिसर आहे. इथे मोठ्या प्रमाणात व्यवसाय सुरु असतो. त्यामुळे पैशाची ने-आन सुद्धा सुरु असते. मात्र याचा फायदा लुटारु घेत असल्याचं या घटनेने पुन्हा एकदा पुढे आलं. इतवारी मार्केट परिसरात चार चोरट्यांनी चाकूचा धाक दाखवत भर दिवसा एका कुरियर कंपनीच्या मॅनेजरकडून 20 लाख रुपये लुबाडले. पण पोलिसांनी मोठ्या शिताफीने त्यापैकी एका चोरट्याला बेड्या ठोकल्या. त्यामुळे इतर चोरटेही लवकरच पोलिसांच्या जाळ्यात अडकण्याची शक्यता आहे.
एका कुरियर कंपनीचा मॅनेजर स्कुटीने पैसे घेऊन आपल्या मालकाच्या घरी जात होता. मॅनेजर चालवत असलेल्या स्कुटीच्या डिक्कीत 20 लाखांची रोख रक्कम होती. मॅनेजर आपल्या मालकाच्या घरी ते पैसे घेऊन जात असताना तीन भामट्यांनी त्याला अडवलं. चोरट्यांनी मॅनेजरला चाकूचा दाख दाखवत गाडी हिसकावली. त्यानंतर ते स्कुटी घेऊन पसार झाले.
मॅनेजरने तातडीने आपल्यासोबत घडलेल्या सर्व घटनेची माहिती मालकाला दिली. मालकाने पोलीस ठाण्यात तक्रार केली. त्यानंतर पोलीस घटानस्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. पोलिसांनी परिसरातीस सीसीटीव्ही फुटेज तुपासले. त्यावेळी काही सीसीटीव्हीत चोरटे गाडीने पळताना दिसत आहेत. त्याच फुटेजच्या आधारावर पोलिसांनी एका चोरट्याला बेड्या ठोकल्या. तर दोन आरोपींची ओळख झाली असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. याप्रकरणाचा पुढील तपास पोलिस पथक करीत आहे.