गोंडपिपरी काँग्रेस कमिटी चा भारत बंदला पाठिंबा

47

गोंडपिपरी काँग्रेस कमिटी चा भारत बंदला पाठिंब

गोंडपिपरी काँग्रेस कमिटी चा भारत बंदला पाठिंबा
गोंडपिपरी काँग्रेस कमिटी चा भारत बंदला पाठिंबा

राजू ( राजेंद्र ) झाडे
गोंडपीपरी तालुका प्रतिनिधी
मो नं 9518368177

गोंडपीपरी :-केंद्रातील भाजपाच्या मोदी सरकारने मातृसंस्था आरएसएसचा इशाऱ्यावर तीन काळे कायदे पारित करून शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचा प्रत्यक्ष कृती कार्यक्रम अमलात आणला त्याचा निषेध म्हणून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी च्या आदेशानुसार गोंडपिपरी -राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार सुभाष धोटे यांच्या मार्गदर्शनात तालुका काँग्रेस कमिटी गोंडपिपरी च्या वतीने बंदला पाठिंबा दर्शविण्यात आला व तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
. गोंडपिपरी येथील मुल -अहेरी रोड वरील शिवाजी चौक पॉईंट जवळ तालुक्यातील शेकडो कार्यकर्ते एकत्र आले. मोदी सरकारच्या व भाजपा आरएसएस च्या शेतकरीविरोधी धोरणाविरुद्ध घोषणा देण्यात आल्या व त्यानंतर निवेदन घेऊन शेकडो कार्यकर्ते तहसील कार्यालय गोंडपिपरी येथे पोहोचले व तहसीलदार के .डी .मेश्राम यांना निवेदन सादर करण्यात आले निवेदन सादर करताना कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुरेशराव चौधरी, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तुकाराम जी झाडे, बाजार समितीचे संचालक प्राध्यापक शंभुजी येलेकर, महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा रेखाताई रामटेके, गोंडपिपरी शहराध्यक्ष देवेंद्रजी बट्टे ,अनुसूचित जाती विभागाचे गौतम झाडे, सचिन फुलझेले, आशीर्वाद पिपरे, तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष देविदास सातपुते, तालुका काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष तथा कृषी सल्लागार समिती अध्यक्ष नामदेव सांगळे, दरु र चे उपसरपंच बालाजी चं कापुरे, साले झरी सरपंच राजू राऊत, वासू भाऊ नगारे, बबलू गेडाम, माजी नगरसेविका गेडाम ताई, युवक काँग्रेसचे सोनल झाडे, आणि काँग्रेसचे बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.