लाॅकडाउनच्या आड रेल्वे प्रशासनाची प्रवाशांच्या पाठीत खंजीर खुपसण्याची तयारी: एकता प्रतिष्ठा

✒ आशिष अंबादे ✒
वर्धा जिल्हा प्रतिनिधी
8888630841 हिंगणघाट
:- सामान्य माणूस कोरोनाशी आणी पर्यायाने स्वता:च्या अस्तित्वासाठी रोजगार, दैनंदिन प्रवास, पगार कपात, महागाई अश्या अनेक पातळ्यांवर लढत असताना, हिंगणघाट येथे रेल्वे गाड्यांचा थांबा नसल्याने प्रवाशांची गैरसोय होते. त्यांना नागपूर अथवा वर्धा येथे जाऊन समोरचा प्रवास करावा लागतो. याकडे सरकारने लक्ष देऊन हिंगणघाट येथे रेल्वे गाड्यांचा थांबा देण्यात यावा, लाखो लोकांची जीवनदायी असलेली रेल्वे गाडी कोरोना काळापासून हिंगणघाट रेल्वेस्थानकावर रेल्वेगाड्यांचे थांबे रद्द केल्याने तालुक्यातील प्रवाशी जनतेचे हाल होत असून हिंगणघाट – समुद्रपुर तालुक्यातील जनता या रेल्वेस्थानकावरील थांबणाऱ्या सर्व गाड्यांचे थांबे पूर्वतत सुरु करण्यात यावे, अशी मागणी एकता प्रतिष्ठानने केंद्रीय रेल्वे मंत्री अश्र्विन वैष्णव, मंडल रेल्वे प्रबंधक नागपुर. मार्फत एस एस सवई (स्टेशन प्रबंधक हिंगणघाट) ए. के. स्वर्णकार (उप प्रबंधक)
अनिल कुमार शर्मा (उपनिरीक्षक आर पी एफ) यांना निवेदन सादर केले.
हिंगणघाट शहर हे वर्धा या शहरापेक्षा ही मोठे असून पुलगाव व वरोरा ही शहरे लहान असून सुद्धा येथे रेल्वे गाड्यांचे थांबे कोरोनाकाळानंतर पूर्वतत करण्यात आले. परंतु हिंगणघाट शहर हे औद्योगिक शहर म्हणून ख्यातिप्राप्त आहे. येथे अनेक टेक्सटाईल पार्क, सुगुणा उद्योग, मोहता उद्योगसमूहासारखे महत्वाचे उद्योगधंदे आहेत. शहराची लोकसंख्या सुद्धा मोठ्याप्रमाणात असून ग्रामीण तसेच शहरी भागातील विद्यार्थी शिक्षण तसेच नोकऱ्यांसाठी पुणे, मुंबई आणि इतर राज्यांत ये-जा करतात. ज्यांचा उदरनिर्वाह रेल्वे वर होता त्यांच्यावर उपासमारीची पाळी आली आहे.
विदर्भातील मोठी कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगणघाट शहरातच आहे. हिंगणघाट हे महत्वाचे ठिकाण असून सुद्धा हिंगणघाट शहरात गेल्या दीड वर्षापासून रेल्वेचे थांबे बंद करण्यात आले आहे. यामुळे येथील जनतेला मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे.
अश्या परिस्थितीत प्रवाशांकडून गाडीचे थांबे सुरळीत करण्याची मागणी जोर धरत आहे. सुरु असलेल्या गाड्यांचे थांबे काढणे हा प्रवाशांवर केला जानारा मानसिक आणि शारीरिक अत्याचारच आहे. लाॅकडाउनच्या आडुन प्रवाशांच्या मुळावर उठलेल्या ह्या निर्णयाचा एकता प्रतिष्ठान हिंगणघाट विरोध करते.
प्रशासनाने हा तुघलकी निर्णय मागे घेण्यात यावा आणी जनतेला सदर रेल्वे थांबे पुन्हा बहाल करण्यात यावे अशी मागणी एकता प्रतिष्ठान हिंगणघाट द्वारे केली. तसेच परिसरातील प्रवासी व बिगरप्रवासी संघटना व स्थानिक लोकप्रतिनिधी विनंती करण्यात आली की, प्रवाशांच्या रेल्वे प्रशासना विरुद्ध लढ्यात सहभागी होवुन रेल्वे प्रशासनाचा हा तुघलकी निर्णय मागे घेण्यास भाग पाडावे अशी विनंती एकता प्रतिष्ठान हिंगणघाट तर्फे करण्यात आली.
यावेळी निवेदन देताना मनोहर कांबळे, प्रमोद हस्ते, महादेव भोंगाडे, सिद्धार्थ धनवीज, प्रवीण शंभरकर, प्रफुल क्षिरसागर, प्रतिक कांबळे, अक्षय काटकर, प्रशील भगत, सुमेध खोब्रागडे, संदेश भांसे, मयुर नगराळे, साहील कांबळे, अखिल धाबर्डे, संदेश थुल, प्रज्वल मेंढे, आर्यन कांबळे, चेतन घुसे, रोहीत कांबळे, अमीत कांबळे, रुषभ इंदुरकर, मोहनीश लोहकरे, अजीत कांबळे इत्यादी उपस्थित होते.