*बालविकास प्रकल्प अधिकारी पारखी साहेबांचा कुपोषण निर्मूलनाचा प्रयत्न प्रेरणादायी*
*बाळू संस्था अंतर्गत 7 कुपोषित बालकांना पोषण आहार बाळू किट वितरित*

*बाळू संस्था अंतर्गत 7 कुपोषित बालकांना पोषण आहार बाळू किट वितरित*
✍संतोष मेश्राम✍
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
( ग्रामीण )-9923497800
गोंडपीपरी ,सविस्तर वृत्त खाली ल प्रमाणे आहे की
आज गोंडपिपरी येथील बाल विकास प्रकल्प अधिकारी शरद पारखी साहेब यांचा जन्मदिवस होता .त्यानिमित्ताने बाळू बी ए पार्ट ऑफ युनिट संस्था राजुरा अंतर्गत गोंडपिपरी तालुक्यातील धानापूर परिसरातील सात कुपोषित बालकांना वाढदिवसानिमित्त होणारा अनावश्यक खर्च टाळून कुपोषित बालकांना बाळूची पोषण आहार किट पारखी साहेबांनी दिली .यावेळी जिल्हा परिषदेच्या सदस्य स्वातीताई वडपल्लीवार, संवर्ग विकास अधिकारी शेषराव भुलकुंडे,शिवसेना तालुकाप्रमुख सुरज माडूरवार, विस्तार अधिकारी शिंदे साहेब, विस्तारअधिकारी सावसाकडे साहेब, बाळू चे संस्थापक अध्यक्ष विस्तार अधिकारी अमित महाजनवार,धानापूरचे सरपंच योगिताताई वडस्कर, पंचायत समिती माजी सदस्य संजय वडसकर, कृषी विभागाचे राठोड साहेब, पंचायत समिती कृषी अधिकारी डाखरे साहेब,पत्रकार समिर निमगडे,प्रख्यात युवा वक्ते अनिकेत दुर्गे ,अक्षय सूरतेकर,उपस्थित होते.