नवसंजीवनच्या विद्यार्थ्यांतर्फे ई-पीक बाबत मार्गदर्शन

पंकज रामटेके
घुग्घुस प्रतिनिधी
मो.८४८४९८८३५५
डॉ. पंजाबराव देशमुख कृषीविद्यापीठ अकोला संलग्नित येथील नवसंजीवन शिक्षण प्रसारक मंडळ कृषी महाविद्यालय दारव्हाच्या विद्यार्थ्यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील बेलसनी गावात ई-पीक पाहणी कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांना अँप हाताळणी तसेच शेतकऱ्याला स्वतःच्या शेतीची नोंदणी कशी करावी त्याची प्रक्रिया ई -पीक अँपचे नियंत्रण त्याचे फायदे सर्व शेतकऱ्यांना समजून सांगितले सध्या स्थितीत होत असलेल्या मुसळधार पाऊस व पावसा अभावी होत असलेले पिकांचे नुकसान याची दाखल घेत राज्य सरकारने ई-पीक पाहणी अँप विकसित केले आहे. या अँपच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या पिकांचे पावसामुळे नुकसान व अभावी नुकसान झाल्यावर कमीत कमी वेळेत तक्रार पीक विमा कंपन्यापर्यंत पोहचविता येईल असे सांगत या संदर्भात प्रात्याक्षिक देत विद्यार्थ्यांनी गावातील शेतकऱ्यांना माहिती दिली. सदर कार्यक्रम प्राचार्य प्रभाकर बोबडे, पंकज खाडे, यांच्या मार्गदर्शनात रितिक घडले, तेजस्विनी आवारी या विद्यार्थ्यांनी कार्यक्रम घेतला यावेळी शेतकरी उपस्थित होते.