भारतीय बौद्ध महासभा व समता सैनिक दल यांच्या वतीने धम्मयान मासिक वाचन मेळावा संपन्न.

✒औरंगाबाद जिल्हा प्रतिनिधी✒
रांजणगाव शेणपुंजी:- आज जगाला बुद्धाचा विचाराची गरज आहे. आज संपुर्ण विश्वच एक अशा विनाशाचा दिशेने जात आहे. मानवमुक्तीचा लोककल्याण कारी विचार समाजात रुजले पाहिजे म्हणुन भारतिय बौद्ध महासभा आणि समता सैनिक दलाचे निरंतर कार्य सुरु आहे.
याच पार्श्वभूमीवर दि. 26 सप्टेंबर रविवार रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक रांजणगाव शेणपुंजी व कपीलवस्तु बुद्ध विहार येथे साप्ताहिक बुद्ध वंदना निमित्त भारतीय बौद्ध महासभा व समता सैनिक दल यांच्या मार्फत धम्मयान मासिक वाचन मेळावा संपन्न झाला यावेळी साहेबराव शेजवळ, पांडुरंग सातदिवे, नारायण तात्या कानडे, अविनाश सोनवणे सुधाकर जाधव, कांबळे, बेटके, पठारे आई व कपिलवस्तू बुद्ध विहाराचे सर्व पदाधिकारी धम्म उपासक-उपासिका मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.